SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटीलविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे : डॉ. अजितकुमार पाटीलनैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळाधैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मानभारतीय लोकशाही टिकविण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आवश्यक : प्रा. डॉ. प्रवीण पाटील‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर जि.प. सदस्या विनिता भोगम ॲक्शन मोडवरशिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त सोहळ्यात ६०,२५० पदवीधर; विद्यार्थिनींची ५७.५५ टक्के बाजी, ‘विकसित भारत २०४७’ चा निर्धारस्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते व सत्यशोधक महात्मा जोतिराव फुलेनवे दानवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १९३ नागरिकांची तपासणी

जाहिरात

 

‘गोकुळ’च्या प्रगतीत प्राथमिक दूध संस्था कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा : चेअरमन राजेश पाटील

schedule28 Nov 26 person by visibility 141 categoryउद्योग

◼️दूध खरेदी दरवाढीच्या निर्णयाबद्दल प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार 

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा दिल्याबद्दल गोकुळशी संलग्न प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन राजेश पाटील व सर्व संचालक मंडळाचा सत्कार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. गोकुळच्या शिरगाव येथील प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, कर्मचारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले.

सत्काराला उत्तर देताना चेअरमन राजेश पाटील म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून गोकुळची पुढील वाटचाल सुरू आहे. दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती साधणे हेच संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गोकुळच्या प्रगतीमध्ये संलग्न प्राथमिक दूध संस्था, संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांची गोकुळप्रती असलेली आस्था आणि आपुलकी यापुढेही कायम राहावी. दूध संस्था कर्मचारी संघटनेने दिलेल्या विविध मागण्यांबाबत संचालक मंडळामध्ये विचारविनिमय करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले, संघाच्या विविध योजना, अनुदाने आणि उपक्रमांची माहिती प्रत्येक दूध उत्पादकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्राथमिक दूध संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. दूध संकलन वाढीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.

आगामी काळातील संभाव्य चारा व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आतापासूनच वैरण लागवड, मुरघास निर्मिती, पाणी व्यवस्थापन, जनावरांचा संतुलित आहार व आरोग्य याबाबत दूध संस्थांचे सचिव व कर्मचारी यांनी मार्गदर्शन करावे. जेणेकरून दूध उत्पादनातील संभाव्य घट आणि दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी गोकुळचे चेअरमन राजेश पाटील, संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, विरेंद्र मंडलिक, राहुल पाटील, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, अजित नरके, किसन चौगले, मदन देसाई, रणजितसिंह दि. पाटील, बाबासाहेब चौगले, रणजितसिंह कृ. पाटील, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, शशिकांत खोत, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. भाग्यश्री डोंगळे, शासन नियुक्त संचालक शिवाजी आडनाईक, डॉ. प्रविणचंद्र हेंद्रे, ॲड. प्रशांत पाटोळे, कृष्णात पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शिवाजी शिंदे, विश्वास पाटील, सुरेश जाधव, दत्तात्रय बोळावे, भैरू तानवडे, कृष्णात पुंगावकर, आबासो पाटील, रामचंद्र चौगले, संभाजी सुतार, बाबुराव परीट, अशोक शिरढोणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, दूध संस्थांचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes