SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागसरोज पाटील यांना 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' जाहीर; शनिवारी वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळाधैर्यशील भोसलेची जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी; ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष जलतरणपटूचा मानभारतीय लोकशाही टिकविण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन आवश्यक : प्रा. डॉ. प्रवीण पाटील‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर जि.प. सदस्या विनिता भोगम ॲक्शन मोडवरशिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त सोहळ्यात ६०,२५० पदवीधर; विद्यार्थिनींची ५७.५५ टक्के बाजी, ‘विकसित भारत २०४७’ चा निर्धारस्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते व सत्यशोधक महात्मा जोतिराव फुलेनवे दानवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १९३ नागरिकांची तपासणीकोल्हापूर : अतिक्रमण आणि नागरी प्रश्नांवरून स्थायी समिती सभेचे कामकाज रोखले; जोपर्यंत कारवाईचे उत्तर नाही, तोपर्यंत कामकाज नको; सदस्यांचा आक्रमक पवित्राचंबुखडी मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व दुरुस्तीमुळे सोमवारी बालिंगा जलउपसा केंद्रावर अवलंबून भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार

जाहिरात

 

नैतिक मूल्यांची रुजवणूक करणारी ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ जिल्ह्यात उत्साहात; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

schedule28 Nov 26 person by visibility 142 categoryसामाजिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ईद फेस्टिव्हल, कोल्हापूरच्या वतीने मा. हाजी बाळासाहेब आत्तार, मा. हाजी अब्दुल गफूर वंटमुरे आणि मा. हाजी डॉ. आदम आत्तार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ आज शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांवर मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी तब्बल दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


विद्यार्थ्यांमध्ये प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जीवनचरित्र, सदाचार, बंधुभाव, मानवता आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांतील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन गटांमध्ये हिंदी भाषेतील ‘दीनीयात’ पुस्तकावर आधारित १०० बहुपर्यायी प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धेची पूर्वतयारी करता यावी, यासाठी शंभर रुपये किमतीचे ‘दीनीयात’ पुस्तक विशेष सवलतीमध्ये अवघ्या २० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले होते.


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यात पाच ठिकाणी परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती. यामध्ये मुस्लिम बोर्डिंग (दसरा चौक, कोल्हापूर), मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल (सरनाईक वसाहत, कोल्हापूर), नॅशनल हायस्कूल (इचलकरंजी), उर्दू विद्यामंदिर (रुकडी) आणि अँग्लो उर्दू हायस्कूल (शिरोली पुलाची) या केंद्रांचा समावेश होता. सर्वच केंद्रांवर विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.


या ज्ञानस्पर्धेचे आयोजन ईद फेस्टिव्हलचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर ‘दीनीयात’ ज्ञान परीक्षा आयोजन समितीने केले. लवकरच परीक्षेचा निकाल जाहीर करून विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes