SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नाम. मुश्रीफ, नाम.आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट; डोंगळे कुटुंबियांकडून दोन्ही मंत्र्यांचा सत्कारनूतन मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांचे विमानतळावर स्वागतकरवीर नगरीमध्ये कॅबिनेट मंत्री मुश्रीफ, आबिटकर यांचे जोरदार स्वागतबीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस'बांधावरची झाडे’ निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे: डॉ. नंदकुमार मोरे; डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशनरोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात 2 हजार 856 कोटी रुपये जमासंपुर्ण कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सोमवारी राहणार बंद...डीकेटीईची टीम इनोव्हेटर्सची चेन्नई येथील देशपातळीवरील डीझाईन स्पर्धेत तृतीय क्रमांकाने सन्मानविद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’मध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंबटाकाळा व उद्यमनगर येथील मोठया दोन थकबाकीधरकांकडून 6 लाख 69 हजार वसूल

जाहिरात

 

राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ; जिल्ह्यातील 40 कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन

schedule20 Sep 24 person by visibility 267 categoryदेश

कोल्हापूर : राज्यातील महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील निवडक 1 हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचा तसेच विविध उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रारंभ करण्यात आला. कौशल्य विकास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने झालेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील 40 महाविद्यालयांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.

 स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील केंद्राच्या प्रारंभ कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, या संस्थेचे डॉ.बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक विरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक रजनी मोटे आदी उपस्थित होते.

 कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या उद्देशाने राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील 1 हजार निवडक महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes