SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ऊस शेतीतील ए. आय. तंत्रज्ञानामुळे फोंड्या माळावर एकरी ९० टन उत्पादनईद फेस्टिवलतर्फे आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ आता २८ नोव्हेंबरला!हुतात्मा कन्हय्यालाल दत्त: अलिपूर कटातील निडर क्रांतिकारकशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनपात्र झोपडपट्टीधारकांना हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून दया; एकही नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापुरात प्रथमच बॉयलर अटेंडंट डिप्लोमा; डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे कौशल्याधारित शिक्षणाचा नवा पर्यायग्रामीण महाराष्ट्रातून जागतिक फुटबॉलच्या शिखरापर्यंत अंजू तुरंबेकर यांची झेप!कोल्हापूर शहरासह लगतच्या १३ गावांतील विकासकामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश; कोल्हापूरच्या हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांचा समावेश“महापौरपद हे कोल्हापूरच्या विकासाचे माध्यम; मला अधिक कालावधी मिळाल्यास शहराला ‘इंदूर’सारखे बनवण्याचा प्रयत्न करेन” : महापौर रूपाराणी निकम

जाहिरात

 

ऊस शेतीतील ए. आय. तंत्रज्ञानामुळे फोंड्या माळावर एकरी ९० टन उत्पादन

schedule20 Nov 26 person by visibility 105 categoryराज्य

◼️मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून ए. आय. तंत्रज्ञानाचा गौरव
 ◼️आधुनिक ए. आय. तंत्रज्ञानानेच शेती आणि शेतकरी टिकेल
         
करनूर : ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आणि काळाची गरजच बनत चाललेला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या करनूर (ता. कागल) येथील फोंड्या माळरानावरील शेतीमध्ये ए. आय. च्या जोरावर एकरी तब्बल ९० टन ऊस उत्पादन मिळाले आहे. मंत्री  मुश्रीफ यांनी शेतावर शिवार फेरी करून पाहणी केली. यावेळी  मुश्रीफ यांनी ए. आय. तंत्रज्ञानाचा गौरव केला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने दोन हजार एकरांमध्ये ए. आय. चा वापर करण्याचा निर्धार आहे. त्यापैकी अडीचशे एकरांवर हा प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
           
 मुश्रीफ म्हणाले, आजमितीला कोल्हापूर जिल्ह्यातील एकरी उत्पादन सरासरी २५ टन आहे. ऊस उत्पादनातील ही घट शेतकऱ्याला न परवडणारी आहे. निव्वळ ऊसदर वाढवून ऊसशेतीचे अर्थकारण टिकणार नाही. त्यावर इलाज म्हणून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन, सुविधा आणि सहकार्यही करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी राज्य सरकारच्यावतीने एक हजार कोटींची तरतूदही करून ठेवली आहे.

 बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,  मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना या चार संस्थांच्या समन्वयातून ऊस शेतीसाठी आणि पर्यायाने ऊसकरी शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी साकारलेला ऊसउत्पादन वाढीचा हा शेवटचा पर्याय वरदान ठरेल, असा विश्वास मंत्री  मुश्रीफ यांनी व्यक्त केला.        
          
□ यापूर्वी ४० टन व आता ९० टन.......!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, २५ वर्षांपूर्वी माळरानाची ही शेती अवघ्या एकरी दहा रुपये दराने विकत घेतली होती. त्यानंतर खडकाळ फोंड्या माळरानामध्ये माती सोडून ठिबक सिंचनाने ओलिताखाली आणली. यापूर्वीचे ऊस उत्पादन एकरी ३५ ते ४० टन होते. ए. आय. च्या वापराने ते माळरानातही ९० टनावर आले आहे. मी शेती करीत असल्यापासून माझ्या आयुष्यातील ए. आय. मुळे आलेले हे सर्वात जास्त उत्पादन आहे, असेही ते म्हणाले. 
​                 
□ काळ्या जमिनीत एकरी १२५  टन मिळेल.....
मंत्री  मुश्रीफ म्हणाले, फोंड्या माळरानावरील शेतामध्ये ए. आय. च्या जोरावर एकरी ९० टन ऊस उत्पादन मिळवण्यामध्ये यश मिळाले आहे. काळ्या जमिनीत तर  एकरी १२५ हून अधिक ऊस उत्पादन मिळेल, असा माझा ठाम विश्वास आहे. काळ्या जमिनीतील उसाची तोडणी होताच त्या शेतामध्येही शिवारफेरी करून कारखान्यामार्फत माहिती दिली जाईल.
              
□ शेतकऱ्यांवर एक रुपयाही खर्च नाही......
ऊस शेतीमध्ये ए. आय. च्या वापरासाठी हेक्टरी २५,००० रुपये खर्च येतो. त्यामध्ये १८,२५० रुपये व्ही. एस. आय. कडून अनुदान रूपात मिळतात. उर्वरित;  शेतकरी वाटा रुपये ६,७५० व इतर साहित्याच्या अपेक्षित खरेदीसाठी केडीसीसी बँकेकडून नऊ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यावर एक रुपयाही खर्च पडत नाही.
           
●ऊस शेतीमध्ये ए. आय. वापराचे फायदे........
□ अमेरिकास्थित मायक्रोसॉफ्टकडून सॅटेलाईटद्वारे अखंडपणे संकलित केलेल्या डेटाचे विश्लेषण होते. 
        
□ पाण्याची गरज व प्रमाणासह खतांची मात्रा, उसावरील खोडकीड, लोकरी मावा, तांबेरा, पांढरी माशी आदी किडींचा पूर्वअंदाज देते. 
      
□ हवामान केंद्र म्हणजेच वेदर स्टेशनच्या माध्यमातून उसावरील रोग व उपाय यांचेही मार्गदर्शन करते. त्यामुळे रोगांचे निर्मूलन करणे सोपे झाले.
            
□ वेदर स्टेशनच्या माध्यमातून तापमान तपासणी व फवारणीचा अचूक अंदाज देते, अचूक वेळ देते. सेंसरमुळे मातीच्या गुणधर्मासह ओलावा समजतो. 
            
□ अचानक झालेली तापमानवाढ, अचानक वाढलेली थंडी, अवकाळी पाऊस, धुके यासारख्या हवामान बदलामुळे पिकावर पडणाऱ्या ताणांची माहिती व अचूक उपाय सुचविते. 
            
□ ठिबकद्वारे ५० टक्के पाण्यात बचतीसह खते आणि औषधे थेट मुळात लागू होतात.         
                 
बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉ. तुषार जाधव म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने कार्यक्षेत्रात ऊस शेतीमध्ये एआयच्या वापराचे नियोजन अतिशय नियोजनबद्ध व तंतोतंत सुरू आहे. ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू अशा तिन्ही हंगामात कारखान्यामार्फत सुरू आहे. फोंड्या माळाच्या हलक्या जमिनी, मध्यम जमिनी आणि चांगल्या प्रतीच्या जमिनी, अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीत हा प्रयोग सुरू आहे. एकापेक्षा जास्त विविध ऊसजातींच्या माध्यमातून हा प्रयोग सुरू आहे. त्याचे परिणाम दुपटीहून अधिक ऊस उत्पादन वाढीमध्ये येत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes