शेणगांव येथे जुगार खेळ खेळणाऱ्या 4 जणांकडून 7,360/- रुपये रोख रक्कमेसह एकूण 1,79,360/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
schedule18 Oct 25 person by visibility 76 categoryगुन्हे

कोल्हापूर : शेणगांव, (ता. भुदरगड) येथे पत्याचा जुगार खेळ खेळणारे 04 इसमांना पकडुन त्यांचेकडुन 7,360/- रुपये रोख रक्कमेसह एकूण 1,79,360/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
मौजे शेणगाव, ता. भुदरगड गावचे हद्दीत, सणगर गल्ली परिसरातील शिवाजी विठ्ठल सणगर यांचे शेतातील पत्र्याचे बंदीस्त शेडमध्ये काही इसम पत्याचे भारी पानावर चढाओढीने पैसे लावून तीन पानी पत्याचा पलास नांवाचा जुगार खेळ खेळत आहेत. सदर माहितीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथकाने दि. १७/१०/२०२५ रोजी दुपारी १६.३० वा. चे सुमारास मौजे शेणगाव, ता. भुदरगड गावचे हद्दीत, सणगर गल्ली परिसरातील शिवाजी विठ्ठल सणगर यांचे शेतातील पत्र्याचे बंदीस्त शेडमध्ये छापा टाकला. त्यावेळी पोलीसांची चाहुल लागलेने ०२ इसम पळून गेले व १) राजेश विठ्ठल देसाई व.३०, रा. म्हसवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, २) बबन गणपती सातपुते व. ५६, रा. लोटेवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, ३) रविंद्र राजाराम लोहार व. ४६, रा. आकुर्डे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, ४) प्रविण मारूती कुंभार व. ३८, रा. आकुर्डे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर असे ताब्यात घेतले. पळून गेलेले व ताब्यात असलेले असे सर्वजण सदर ठिकाणी पत्याचे तिन पानाचा पलास नावाचा जुगार खेळ खेळत होते. ताब्यात घेतलेल्या इसमांकडे चौकशी केली असता सदर पत्र्याचे शेड शिवाजी विठ्ठल सणगर रा. शेणगांव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर यांचे मालकीचे असल्याचे व संजय एकल रा. शेणगांव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर यांनी सदरचे शेड हे जुगार खेळ खेळण्याकरीता भाड्याने घेतले असल्याचे सांगितले.
घटनास्थळावर ७,३६०/- रुपये रोख रक्कम, ०४ मोबाईल हॅण्डसेट, ०२ मोटर सायकली व इतर जुगाराचे साहित्य असे एकूण १,७९,३६०/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. शेड मालक शिवाजी विठ्ठल सणगर व जुगार खेळाकरीता शेड भाडे तत्वावर घेणा-या संजय एकल तसेच ताब्यात घेतलेल्या व पळून गेलेल्या इसमांविरुध्द जुगार कायद्यान्वये भुदरगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार , अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अमंलदार संजय देसाई, सतिश सुर्यवंशी, राजू कोरे, समीर कांबळे, हंबीरराव अतिग्रे, अमित मर्दाने यानी केलेली आहे.