के.एम.टी.बसेसच्या फेऱ्यांमध्ये कपात
schedule18 Oct 25 person by visibility 64 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : दि.20 ऑक्टोबर ते दि.22 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना दिपावली सणानिमित्त सुटी असलेने, मार्गावरील प्रवासी संख्या कमी होते. त्यामुळे दि.20 ऑक्टोबर ते दि.22 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये के.एम.टी. बस फेऱ्यांमध्ये कपात करणेत आलेली आहे.
तरी, प्रवासी नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध बस सेवेचा लाभ घेऊन सहकार्य करावे,
असे आवाहन परिवहन उपक्रमाचे वतीने करणेत येत आहे.