राधानगरी तालुक्यातील पनोरीतील वृध्द महिलेच्या क्लिष्ट खुनाचा छडा, दोन आरोपी जेरबंद
schedule10 Sep 25 person by visibility 359 categoryगुन्हे

▪️स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राधानगरी पोलीसांची कारवाई
पनोरी गावातील घरी एकटीच राहणारी वृध्द महिला श्रीमंती हरी रेवडेकर (वय ७३ रा.पनोरी ता.राधानगरी) या ०७ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह गोबरगॅसमध्ये मिळुन आला होता. मृताच्या डोक्यात मारहाणीची जखम दिसुन आल्या होत्या यावरुन अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी कारणास्तव तिचा खुन करुन तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोबरगॅसमध्ये टाकुन दिल्याचे निष्पन्न झाले. त्या बाबत तिचा दत्तक पुत्र अमित हरी रेवडेकर याने राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तपासामध्ये कोणतेही पुरावे अथवा उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती. त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस येणे फार अवघड व आव्हानात्मक होते. याबाबत अभिजीत मारुती पाटील, कपिल भगवान पातले (ता. राधानगरी जिल्हा कोल्हापूर) त्यांना स्थानिक गुन्हें अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यानी सदरचा खुन आपण केल्याची कबुली दिली.
त्या दोघांचेकडे सखोल चौकशी केली असता ते दोघे ही बालपणीचे मित्र असुन ते दोघेही आर्थिक अडचणीत असल्याने त्यां दोघांना पैशाची नितांत गरज होती. म्हणुन त्यांनी नमुद वृध्द महिला ही घरामध्ये एकटीच असते व तिच्या अंगावर दागिणे असतात याची त्याना पुर्ण माहिती होती. म्हणुन तिचे अंगावरील दागिणे लुटण्याचा गेल्या एक महिन्या पुर्वी कट रचला होता. त्यासाठी त्यांनी अनंतचतुर्थीचा दिवस निवडला होता. त्याप्रमाणे गावामध्ये सार्वजनिक गणेश विर्सजन सुरु असताना गावातील नागरिक मिरवणुक पाहण्यासाठी बाहेर असताना व सदरची महिला एकटीच घरी असल्याची संधी साधुन दिनांक ०६ सप्टेंबर रोजी रात्रौ वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिणे लुटत असताना तिने प्रतिकार केल म्हणुन सदर महिलेचे डोक्यात मारहाण करुन तिचा खुन केला. तसेच तिचे दागीने काढुन घेवुन व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत साडीमध्ये गुंडाळुन विजय शंकर बरगे यांचे घरामागील गोबरगॅसमध्ये टाकुन दिल्याचे त्यांनी कबुली दिली.
नमुद आरोपी नामे १) अभिजीत मारुती पाटील वय ३४, २) कपिल भगवान पातले वय ३४ दोघे रा.पनोरी ता. राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांना राधानगरी पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संतोष गोरे राधानगरी पोलीस ठाणे हे करीत आहेत .
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, योगेश कुमार सारे, अपर पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु , उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग आप्पासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संतोष गोरे राधानगरी पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अमंलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, संजय देसाई, अमित सर्जे, राजु कांबळे, विजय इंगळे, राजेंद्र वरांडेकर, हंबिर अतिग्रे, प्रदिप पाटील तसेच राधानगरी पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक पोवार मँडम, भोसले, पोलीस अमंलदार पिंटु खामकर, शेळके, सुदर्शन पाटील, कोळी, रघु पोवार, देसाई, यांनी केलेले आहे.