कोल्हापूर : गावठी 11 हातभट्टीवर छापा; 3,37,160/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
schedule30 Jan 25 person by visibility 291 categoryगुन्हे
कोल्हापूर : गावठी दारु तयार दारु करण्याच्या 11 हातभट्टीवर छापा टाकून 3,37,160/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना माहिती मिळाली की, कंजारभाट वस्ती, मोरेवाडी व साईनगर कंजारभाट वस्ती कणेरीवाडी येथे पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारु तयार करतात. मिळाले माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व इतर पोलीस अमंलदार यांची पथके तयार करून दि.30 जानेवारी रोजी पहाटे राजारामपुरी पोलीस ठाणेचे हद्दीत 07 हातभट्टीवर व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेचे हद्दीत 04 हातभट्टीवर अशा एकूण 11 गावठी दारु तयार करणा-या हातभट्टीवर कारवाई केली आहे.
सदर परिसरात हातभट्टीची दारु तयार करणेकरीता वापरत असणारे 5,600 लिटर कच्चे रसायन, 1540 लिटर पक्के रसायन, 592 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व इतर साहित्य असा एकूण 3,37,160/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नाश केला आहे, सदरबाबत राजारामपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे 07 आरोपींचे विरुध्द व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे 04 आरोपीविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार संजय पडवळ, युवराज पाटील, संजय हुंबे, वसंत पिंगळे, अमित मर्दाने, दिपक घोरपडे, अमित सर्जे, संजय कुंभार, यशवंत कुंभार, हंबीरराव अतिग्रे, सागर माने, विजय इंगळे, विशाल खराडे, प्रविण पाटील, शिवानंद मठपती, महिला पोलीस अमंलदार प्रज्ञा पाटील व तृप्ती सोरटे यांनी केली आहे.