स्वच्छ भारत अभियान 2024-25 चा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा
schedule30 Jan 25 person by visibility 232 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियान 2024-25 चा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज आढावा घेतला. यावेळी महापालिकेचा मागील वर्षाच्या क्रमवारीत यावेळी मोठी सुधारणा करुन टॉप 10 मध्ये कोल्हापूर महानगरपालिका येण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या. स्वच्छ भारत अभियान 2025 अंतर्गत देशस्तरावर विविध वर्गवारीत 12500 गुण दिले जाणार आहेत.
यामध्ये कोल्हापूर कोल्हापूर महापालिका चांगले काम करत आहे. परंतु त्याचे मार्केटिंग व प्रेझेंटेशन करण्यास आरोग्य विभाग कमी पडतो. त्यामुळे आरोग्य विभागाचे सर्व कर्मचा-यांचे ट्रेनिंग घेण्यात यावे. विभागीय कार्यालयास्तरावत त्या त्या क्षेत्रातील शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत विविध कार्यक्रम राबवावे. सोसायटी, मोठ मोठया अपार्टमेंटना त्याचे जागेमध्ये कंपोस्ट खत तयार करण्याच्या सूचना दयाव्यात. नगररचना विभागाने नियमाप्रमाणे शहरातील बांधकामाला मंजूर दिलेल्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम) चे मूल्यमापन करावे. जेथे जेथे हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद आहेत त्या ठिकाणचे केंद्र तात्काळ सुरु करुन घ्यावे. स्वच्छ भारत अभियामध्ये विविध सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा.
स्वच्छता ॲपद्वारे नागरीकांच्या तक्रारी घेऊन त्या निर्गत कराव्यात. यासाठी स्वतंत्र गुणानुक्रम दिले जाणार आहे. शाळा व कॉलेज स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन करावे. स्वच्छतेचा एक दिवस प्रत्येक शाळेत साजरा करावा. सर्व प्रभाग क्षेत्रीय अधिकारी व खाते प्रमुखांनी फिरती करुन स्वच्छता झाली आहे का नाही याची तपासणी करण्याच्या सूचना सर्वांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन एस पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, आर के पाटील, रमेश कांबळे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत आदी उपस्थित होते.