SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रारंभकोरे आर्किटेक्चर व शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेविट कार्यशाळा संपन्नडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारडी. वाय. पाटील अभियांत्रिकीला क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकन; शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम, संशोधन कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान 'शिक्षक कुटुंबांच्या आरोग्यासाठी 'धर्मवीर आनंद दिघे आरोग्य कवच योजना' आणणार,' मंगेश चिवटे यांचे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने रविवारी भव्य पुरस्कार वितरण सोहळा व शिक्षक मेळावामातृ मायेच्या सावलीला ७५ वर्षे पूर्ण, खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात जागतिक नारळ दिन: महत्त्व आणि उपयोगिताकुपोषित बालकांना जिल्हा परिषद सदस्य घेणार दत्तककर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचे सानुग्रह अनुदान

जाहिरात

 

कोरे आर्किटेक्चर व शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेविट कार्यशाळा संपन्न

schedule01 Sep 26 person by visibility 103 categoryशैक्षणिक

वारणानगर : वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, वारणानगर आणि शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेविट (Revit) सॉफ्टवेअर विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM), रेविट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्रिमितीय वास्तुरचना तयार करणे, आराखडे तयार करणे, भिंती, दरवाजे, खिडक्या, स्लॅब, छत, जिने तसेच वास्तु रेखाचित्रांचे दस्तऐवजीकरण आदी विविध बाबींवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

रेविट हे आधुनिक वास्तुरचना क्षेत्रातील महत्त्वाचे सॉफ्टवेअर असून, त्याच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या संगणकीय रचना कौशल्यांना, तांत्रिक ज्ञानाला आणि सर्जनशील विचारांना चालना मिळते.

 कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संगणकावर विविध वास्तुरचना तयार करून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या कार्यशाळेला तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधील विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी आणि प्राचार्य आर्कि. राजेंद्र म. ऐनापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेसाठी  सचिन पतंगे तसेच शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यशाळेचे समन्वयक म्हणून आर्कि. स्मिता नाळे यांनी जबाबदारी पार पाडली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes