SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मातृ मायेच्या सावलीला ७५ वर्षे पूर्ण, खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात जागतिक नारळ दिन: महत्त्व आणि उपयोगिताकुपोषित बालकांना जिल्हा परिषद सदस्य घेणार दत्तककर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचे सानुग्रह अनुदानआदर्श गणेशोत्सव म्हणून कोल्हापूरची ओळख व्हावी : आ. राजेश क्षीरसागरकोल्हापुरात खड्डे बुजविण्यासाठी ‘इन्स्टा रोड पॅचर’चा प्रयोगकोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदे त्वरित भरा; आस्थापना खर्चाची अट शिथिल करा: आमदार सतेज पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी‘गुजरीचा गोविंदा’ च्या ४० व्या वर्षा निमित भव्य कार्यक्रम - बिग बॉस मराठी फेम इरिनासह नामवंत कलाकारांची उपस्थिती; लाखाचे भव्य पारितोषिक अन् आकर्षक कार्यक्रमांची मेजवानीउंचगाव येथे वीज बिल भरणा केंद्र तातडीने सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा शिवसेनेचा इशाराजागतिक कीर्तीचे तज्ज्ञ वारणेत आणणार : एन. एच. पाटील; कोरे अभियांत्रिकीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

जाहिरात

 

मातृ मायेच्या सावलीला ७५ वर्षे पूर्ण, खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्रींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात

schedule01 Sep 26 person by visibility 55 categoryसामाजिक

◼️ पुढचा जन्मही याच मातेच्या पोटी व्हावा, खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले मातृ ॠण, खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते मानपत्र देवून केले मातृशक्तीला वंदन
कोल्हापूर  : मातृ ॠण हे कधीही न फिटणारं ॠण आहे. या ॠणातच कायम राहण्यात आपण धन्यता मानतो. खासदार धनंजय महाडिक यांच्या मातृ मायेच्या सावलीला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. श्रीमती शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून मातोश्रींचे आशिर्वाद घेतले. तर खासदार शाहू महाराज यांनी मानपत्र देवून या मातृशक्तीला वंदन केले.

 पुढचा जन्मही याच मातेच्या पोटी व्हावा, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी मातृॠण व्यक्त केले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मायेची ऊब, प्रेमाचा आधार आणि संस्कारांची शिदोरी देणारी व्यक्ती अशी आईची ओळख आहे. आईच्या निरपेक्ष, निर्व्याज प्रेमाची बरोबरी होवू शकत नाही. ज्या माऊलीने आपल्याला जग दाखवले, त्या आईच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी व्हावा, यासाठी आपणही प्रयत्न करत असतो. यातूनच आजचा दिवस खासदार धनंजय महाडिक परिवारासाठी विशेष आणि अविस्मरणीय ठरला.

 मातोश्री श्रीमती शकुंतला महाडिक आणि मंगलताई महाडिक यांचा आज ७५ वा वाढदिवस. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त महाडिक कुटुंबीयांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट, वाढदिवसाचा केक कापण्याचा कार्यक्रम, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, मातोश्रींना पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्यासाठी सर्वांनीच व्यक्त केलेल्या भावना आणि मातोश्रींकडून मिळणारे आशिर्वाद अशा वातावरणात हा अमृतमहोत्सवी वाढदिवस संपन्न झाला. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी श्रीमती शकुंतला आणि मंगलताई यांना मानपत्र देवून केलेले मातृवंदन लक्षवेधी ठरले. 

याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, सुरेश हाळवणकर,  अंजली चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, जयश्री जाधव, प्रकाश आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक, सम्राट महाडिक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, महेश जाधव, विजय जाधव, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, नगरसेवक आदिल फरास, ऍड. धनंजय पठाडे, पृथ्वीराज पठाडे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या अमृत महोत्सवी वाढदिवसाला हजेरी लावली.

 कार्यक्रमस्थळी महाडिक कुटुंबियांच्या वाटचालीची आणि मातोश्रींबद्दल मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांची चित्रफितही दाखवण्यात आली. आईने आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवत प्रत्येकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ दिली. मुलांच्या जडणघडणीत तिचे योगदान मोलाचे असून, प्रेम, त्याग, संयम आणि संस्कारांच्या बळावर तिने कुटुंबाला संस्कार दिले. त्यांच्या मायेच्या सावलीत आमच्या जीवनाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पुढील जन्मसुध्दा याच मातेच्या पोटी मिळावा, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया सर्वांच्या मनाला स्पर्शुन गेली, या प्रतिक्रियेमुळे सर्वजण भावनिक झाले. यावेळी महाडिक कुटुंबीयांनी आईच्या आठवणींना उजाळा देत तिच्या जीवनप्रवासातील विविध प्रसंग सांगितले.

 यावेळी अरूंधती महाडिक, वैष्णवी महाडिक, मंजिरी महाडिक, संग्रामसिंह कुपेकर, रामराजे कुपेकर, पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह परिवारातील सर्वांनीच आजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आई म्हणजे केवळ नातं नाही, तर संपूर्ण आयुष्याला आधार देणारी मायेची सावली आहे. तिच्या ७५ वर्षांच्या जीवनप्रवासाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. आईच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाडिक कुटुंबीय आनंदात न्हाऊन निघाले होते. प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादांनी भरलेला हा अमृतमहोत्सवी वाढदिवस महाडिक कुटुंबासह सर्वांसाठी अविस्मरणीय प्रसंग ठरला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes