आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकरचे यश
schedule21 Jul 25 person by visibility 375 categoryक्रीडा

कोल्हापूर : बेंगळुरू येथील सेंट फ्रान्सिस डे सेल्स कॉलेज (स्वायत्त), येथे दुसरी ट्रिपल क्राउन चेस 2025 स्पर्धा, 19, 20 जुलै रोजी झाली. पार पडली. ब्लीट्झ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकर याने सहा हजार रुपये व पारितोषिक, तसेच रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत तीन हजार रुपये व चषक मिळवले. ब्लीट्झ स्पर्धेमध्ये 160 गुणांची कमाई त्याने केली.
ब्लीट्झ स्पर्धेत 217, रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत 565 देश-विदेशातील खेळाडूंनी भाग घेतलेला होता. या स्पर्धेमध्ये एकूण सहा लाख रुपयांची पारितोषिके होती.
ऋषिकेशने ब्लीट्झ स्पर्धेमध्ये गोव्यातील चॅम्पियन बुद्धिबळ खेळाडू मंदार लाड विरुद्ध विजय संपादन करून साडेसात गुणांची कमाई केली. आणि चौथा क्रमांक मिळवला. स्पर्धेत रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत त्याने सात गुण घेत तिसावा क्रमांक मिळवला.
ऋषिकेश हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, बुद्धिबळ प्रशिक्षक कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.