SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवार!कोल्हापुर : पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 'डायल ११२' सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव; १३ वेगवेगळ्या घटनांमध्ये वाचवले नागरिकांचे प्राण!डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु : डॉ. ए. के. गुप्ताजागतिक प्रथमोपचार दिन: जीव वाचवण्याची कला आणि महत्त्वगणेश विसर्जनावेळी निर्माल्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळागणेशोत्सवात संभाजीनगर तरुण मंडळ करणार मायमराठीचा गजर ! ए आई मला मराठी शिकव अभियान राबविणार ! !विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील व्यवसाय परवाना न घेतल्याने महापालिका व अग्निशमन विभागाची संयुक्त कारवाईगोकुळ निवडणुकीत महायुतीच 'मोठा भाऊ' राष्ट्रवादी; हसन मुश्रीफांचा दावा; दूध संघासह अन्य राजकीय घडामोडींवर विमानतळावर स्पष्टच बोललेसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री इंजिनिअरिंग, शॉर्ट टर्म कोर्सेस चा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात

जाहिरात

 

कोल्हापुर : पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी

schedule12 Sep 26 person by visibility 75 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पीएमई बस सेवेंतर्गत प्राप्त झालेल्या ४० नवीन बसेसपैकी १२ मीटर व ९ मीटर अशा दोन अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसची प्रत्यक्ष रस्ता चाचणी आज यशस्वीरीत्या घेण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार ही चाचणी घेण्यात आली.


१२ मीटर बसची रस्ता चाचणी आर. के. नगर येथील स्वयंभू गणेश मंदिर ते कसबा बावडा या मार्गावर घेण्यात आली. तसेच ९ मीटर बसची चाचणी बोंद्रे नगर ते एस.टी. स्टँड, शाहू मैदान, राजारामपुरी मार्गे गंगावेश या मुख्य व अंतर्गत मार्गावर घेण्यात आली.

या प्रत्यक्ष चाचणीदरम्यान शहरातील विविध वाहतूक सिग्नल, संभाव्य वाहतूक कोंडीची ठिकाणे, बस थांब्यांवरील प्रवाशांचे चढणे-उतरणे, रस्त्यांची स्थिती तसेच स्पीड ब्रेकर्समुळे बसच्या संचालनावर होणारे परिणाम यांचा तांत्रिक व व्यावहारिकदृष्ट्या सखोल अभ्यास करण्यात आला. बसची शहरातील विविध मार्गांवर सुरक्षित, सुरळीत व प्रभावीपणे वाहतूक करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचे मूल्यमापन करण्यात आले.

या रस्ता चाचणीवेळी परिवहन सभापती श्री. सत्यजित जाधव व अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक श्री. संजय भोसले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली. त्यांनी बसमधून प्रवास करून विविध मार्गांवरील वाहतूक संचालनाची पाहणी केली तसेच आवश्यक सूचना दिल्या.
कोल्हापूर शहरात दाखल झालेल्या या अत्याधुनिक व वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरातील नागरिकांमध्ये पीएमई बस सेवेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आजची रस्ता चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर व अधिकृत उद्घाटनानंतर या नवीन बससेवा लवकरच कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
यावेळी सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, जेबीएमचे प्रतिनिधी सचिन साळुंखे, हंसा ऋषिकेश शिंदे, परिवहन विभागाचे चालक रविंद्र बोडके व नितीन ढेरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes