SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेचे सर्वप्रथम दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातकेडीसीसी बँकेला लावलेला दंड भरण्याची माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची तयारी केडीसीसी बँकेला लावलेला दंड भरण्याची माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची तयारी गोविंदराव टेंबे महाराष्‍ट्राचे उपेक्षित साहित्यिक: सुधीर पोटेकोल्हापुरात उद्या होणार 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राष्ट्रीय अभियान २०२६' चा महासमापन सोहळाशिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारीडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रमोद एस. पाटील यांना 'सीआरएस लीडरशिप अवॉर्ड'विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक व सामाजिक सलोखा मंच व समस्त मुस्लिम समाजातर्फे तीव्र धरणे आंदोलनCJP आंदोलन: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर केंद्र सरकारला शनिवारपर्यंतचा अवधीअखेर केंद्र सरकार झुकले! २६ दिवस झुंजणाऱ्या सोनम वांगचुक यांचे उपोषण समाप्त!

जाहिरात

 

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” : महापौर रूपाराणी निकम

schedule23 Jul 26 person by visibility 210 categoryमहानगरपालिका

◼️रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजतर्फे सावित्रीबाई फुले रुग्णालयास 34 लाखांच्या अत्याधुनिक कलर डॉपलर सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण

कोल्हापूर  : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्यावतीने, अमेरिकेतील रोटरी क्लब ऑफ मायामी एअरपोर्ट यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले रुग्णालयासाठी सुमारे 34 लाख खर्चून अत्याधुनिक कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन तसेच त्यासाठी आवश्यक असलेली पूर्णपणे सुसज्ज सोनोग्राफी रूम उभारण्यात आली. या महत्त्वपूर्ण सामाजिक प्रकल्पाचे लोकार्पण महापौर सौ.रूपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवून देण्यात तत्कालीन अध्यक्षा रोटेरियन पूजा गांधी, सचिव रोटेरियन श्रुती मंत्री आणि खजिनदार रोटेरियन प्रशांत मेहता यांचे मोलाचे योगदान लाभले. या प्रकल्पाची संकल्पना व पुढाकार रोटेरियन पूजा गांधी यांनी घेतला असून, प्रकल्प अध्यक्ष रोटेरियन डॉ. अभिजित वज्रमुष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्यात आला. तसेच माजी अध्यक्ष रोटेरियन प्रसाद मंत्री यांनीही या प्रकल्पाच्या नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान देत हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

यावेळी बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या सातत्यपूर्ण समाजसेवेचे मनापासून कौतुक केले. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास क्षेत्रात क्लबने राबविलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “रोटरी हेरिटेजचे कार्य समाजासाठी आदर्शवत असून अशा सेवाभावी संस्थांमुळे समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळत आहे.

 भविष्यातही महानगरपालिका आणि रोटरी हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक लोकहिताचे उपक्रम राबविले जातील.

आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनीही रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजचे अभिनंदन करत सांगितले की, अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आणि रुग्णांना दर्जेदार निदान सेवा उपलब्ध होणार आहे. त्यांनी भविष्यातही महानगरपालिकेच्या विविध सामाजिक प्रकल्पांमध्ये रोटरी हेरिटेजची भागीदारी वाढविण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी नव्याने उभारलेल्या सोनोग्राफी केंद्राची पाहणी करून तेथील सुविधा व आधुनिक यंत्रणेचे कौतुक केले. या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रोटरीचे माजी प्रांतपाल रोटेरियन शरद पै यांनी रोटरीच्या माध्यमातून महानगरपालिकेसोबत भविष्यात आणखी मोठे समाजोपयोगी प्रकल्प राबविण्याची ग्वाही दिली. तर माजी प्रांतपाल रोटेरियन अरुण भंडारे यांनी रोटरी हेरिटेजच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचा गौरव करत, क्लबने समाजासमोर सेवाभावाचा आदर्श निर्माण केला असल्याचे नमूद केले.

यावेळी रोटेरियन प्रशांत मेहता यांनी या आंतरराष्ट्रीय सहकार्याची संपूर्ण माहिती देत, अमेरिकेतील रोटरी क्लब ऑफ मायामी एअरपोर्ट यांच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण प्रकल्प कसा साकार झाला याची माहिती दिली. तसेच रोटरी हेरिटेजने मागील काही वर्षांत आरोग्य, शिक्षण व समाजविकास क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

रोटेरियन प्रशांत कुलकर्णी यांनी या सोनोग्राफी केंद्रामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात दर्जेदार निदान सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी प्रांतपाल रोटेरियन शरद पै, रोटेरियन अरुण भंडारे तसेच सोनोग्राफी मशीनचे पुरवठादार यांचा महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजचे विद्यमान अध्यक्ष रोटेरियन अमित पुनमिया, सचिव रोटेरियन जयेश गांधी यांच्यासह रोटेरियन प्रसाद मंत्री, रोटेरियन प्रशांत कुलकर्णी, रोटेरियन चेतन ओसवाल, रोटेरियन मिलिंद करमळकर, रोटेरियन बिपीन जाजू, रोटेरियन दिनेश दुल्हानी, रोटेरियन हर्षवर्धन तायवडे पाटील, रोटेरियन अनिल पाटील, रोटेरियन अमित पाटील, रोटेरियन नीतू उदयपुरिया, रोटेरियन नीरज उदयपुरिया, रोटेरियन राहुल ओसवाल, रोटेरियन कुमार परमार, रोटेरियन धनंजय थोरात, रोटेरियन विवेक वेद पाठक, रोटेरियन साहिल मणियार तसेच क्लबचे इतर सदस्य व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे डॉ. पावरा यांनी आभार प्रदर्शन करताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, या अत्याधुनिक कलर डॉपलर सोनोग्राफी मशीनची रुग्णालयाला अत्यंत आवश्यकता होती आणि रोटरीने ती गरज ओळखून केलेली ही मदत हजारो गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या यंत्रणेचा अत्यंत प्रभावी व जबाबदारीने रुग्णसेवेसाठी वापर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या या उपक्रमामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेला नवी दिशा मिळणार असून, गरजू नागरिकांना आधुनिक, विश्वासार्ह आणि सुलभ निदान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes