पेठवडगावात सकल मराठा सेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन !
schedule03 Oct 25 person by visibility 90 categoryराजकीय

पेठवडगाव : येथील सर्जेश्री टॉवर्स मार्केट यार्ड रोड येथे सकल मराठा सेना पक्षाचे जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा प्रमुख विलासदादा पाटील यांच्या हस्ते दिमाखात या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राज्य पक्ष प्रवक्ते सुधाकर पिसे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की या पक्षाची ध्येय धोरणे तसेच कार्य हे संपूर्ण बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी असल्याने हा पक्ष उद्याचा किंगमेकर असणार यात माझी तिळमात्र शंका राहिलेली नाही. हा पक्ष राजकीय दृष्ट्या पूर्णपणे जनतेच्या पाठीशी असणार आहे. सर्व जाती धर्मातील बांधवांना घेऊन जाणारा पक्ष आहे. आज विजयदशमी दसरा, महात्मा गांधी जयंती, धम्मचक्र परिवर्तन दिन, लाल बहादूर शास्त्री जयंती, सम्राट अशोका विजयादशमी, या सर्व मंगल दिनादिवशी हे कार्यालय होत आहे याचा आनंद आणि अभिमान वाटतोय, या सर्व विचाराने हा पक्ष बांधला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही नक्की पुढे येणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडीकडे लक्ष ठेवून असणार आहे.
तसेच यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद तालूगडे यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि हा पक्ष तुमचा आहे. या पक्षाची दारे सर्वांसाठी खुली आहेत. हा पक्ष शेतकऱ्यांचा, वंचितांचा, मजुरांचा, दिव्यांगाचा, उपेक्षितांचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा पक्ष किंगमेकरच असेल हे लिहून ठेवा. पक्षाला वाढता पाठिंबा, पक्षाकडे AB प्लॅन, पक्षाची सदस्य नोंदणी, पक्षाचा सोशल मिडिया ग्रुप, वाढता पक्षाचा पाठिंबा, लोकांना बदल हवा आहे. तो घडवण्याचं सामर्थ्य सकल मराठा सेना पक्षात आहे. आता आम्हाला कोणी गणितात धरत नसेल पण आमच्याशिवाय तुमचे गणित बसणार नाहीं हे ही लक्षात ठेवा असे प्रल्हाद तालुगडे यांनी प्रस्थापित सर्वांना आवाहन केले. त्यामुळे सर्वांगीण विकास पाहिजे असेल तर एकच पर्याय सकल मराठा सेना.
यावेळी विजय पाटील, शाखा प्रमुख मारुती पाटील, मारुती यादव, राज्य सदस्या माया तालुगडे, कार्याध्यक्ष अभिजित पाटील, राज्य पक्ष प्रवक्ते सुधाकर पिसे, अंकुश घोलप, निर्मला पाटील, वडगाव महिला आघाडी शाखाप्रमुख अनिता पाटील, महिला सेना सदस्या ऋतिका तालुगडे, सोशल मिडिया शाहुवाडी प्रतिनिधी सचिन कांबळे, सुहास घोंगडे, रोहित माने, स्वप्नील कांबळे,निरंजन नेर्लेकर आणि इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.