SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि 'बजाज स्टेप'च्या पहिल्या तुकडीचा दिमाखदार पदवीदान समारंभ डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचा जागतिक पातळीवर डंकाचाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापुरात एलसीबीची धडक कारवाई; २ लाखांच्या एम.डी. ड्रग्ससह दोघे जेरबंदपुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या कार्यकाळानिमित्त कोल्हापुरात ‘सेवा ज्योती यात्रा’राष्ट्रीय नूडल दिन: चवदार नूडल्सचा खास सोहळा!शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटलांच्या जोडण्या; पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंगस्पंदन चित्रकला स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि 'बजाज स्टेप'च्या पहिल्या तुकडीचा दिमाखदार पदवीदान समारंभ

schedule06 Oct 26 person by visibility 169 categoryशैक्षणिक

◼️विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख करिअरच्या संधींचे मार्गदर्शन

कोल्हापूर  : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि  बजाज सर्व्हिस टेक्निशिएन एक्सलन्स प्रोग्रॅमच्या (स्टेप )पहिल्या तुकडीचा पदवीदान समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. इलेक्ट्रिक वाहनांच्या  वाढत्या युगात कुशल मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस वाढत असताना, विद्यार्थ्यांना आधुनिक वाहन तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान आणि उद्योगाभिमुख कौशल्ये देणाऱ्या या उपक्रमामुळे कुशल मनुष्यबळाची निर्मिती होत आहे. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ' इलेक्ट्रिक मॅन ऑफ कोल्हापूर ' म्हणून प्रसिद्ध असलेले देवेंद्र दिवाण यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “इलेक्ट्रिक वाहने आणि त्यासंबंधीचे संशोधन हेच भविष्यातील मोबिलिटीचे प्रमुख क्षेत्र आहे. वेगाने विस्तारत असलेल्या ई-मोबिलिटी क्षेत्रात प्रशिक्षित आणि कुशल व्यावसायिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार व करिअरच्या संधी निर्माण होत आहेत,” असे त्यांनी नमूद केले. कोल्हापुरात ‘बजाज स्टेप’सारखा उद्योगाभिमुख कौशल्यविकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांचे विशेष कौतुक केले. शिक्षणसंस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्ये आत्मसात करण्याची प्रभावी संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुहास सपाटे यांनी ‘बजाज स्टेप’मधून मिळालेले ज्ञान केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित न ठेवता त्याचा व्यावसायिक जीवनात प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. तसेच, EV सर्व्हिसिंग आणि आधुनिक वाहन तंत्रज्ञानातील या कौशल्यविकासाच्या संधीची माहिती मित्र-नातेवाईकांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाशी जोडावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

‘बजाज स्टेप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, सर्व्हिसिंग, डायग्नोस्टिक्स आणि प्रत्यक्ष कामातील तांत्रिक कौशल्यांचा अनुभव मिळत असून, भविष्यातील ऑटोमोबाईल आणि ई-मोबिलिटी उद्योगासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.


श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे ‘बजाज स्टेप’च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सातत्यपूर्ण सहकार्य, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी 'स्टेप'च्या  उत्तम संचालनासाठी सक्रिय सहभाग घेतला. या पदवीदान समारंभास स्टेप जीटीटी सेंटर हेड श्री. जयकिशन सिमारिया, मोबिलायझर  स्वराज शिंदे, प्लेसमेंट इन-चार्ज श्रीमती अनुप्रिया कदम, BSIETचे प्राचार्य व इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर डॉ. सुहास सापाटे, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. पूर्वा वाईंगणकर , अधिष्ठाता (संशोधन आणि विकास ) व स्टेप समन्वयक डॉ. अभिजित रेडेकर, विभागप्रमुख डॉ. जितेंद्र शिंदे, प्रा. पूनम भोसले आणि प्रा. सकीना भोरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संशोधन आणि विकास समन्वयक प्रा. प्राजक्ता चौगुले, प्रा. सुरभी रेळेकर, प्रा. रोहिणी रसाळ, डॉ. शर्मिन मुजावर आणि प्रा. संदीप राबाडे यांची होती.

 पुढील बॅचमधील प्रवेशाकरिता डॉ. अभिजित रेडेकर (मोबा: 9764891818 ) आणि अनुप्रिया कदम  (मोबा: 9960957518) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes