महायुती सरकारकडून कोल्हापूरला गिफ्ट, उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होत असल्याने कोल्हापूरच्या लढावू बाण्याला यश : खासदार धनंजय महाडिक
schedule01 Aug 25 person by visibility 331 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूरची जनता लढावू बाण्याची आहे. तर राज्यातील महायुती सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार लोकाभिमुख कारभार करत आहे. त्यामुळेच कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर करून, एका दिर्घ लढयाला यश आले आहे. येत्या १८ ऑगस्टपासून कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होण्याची घोषणा झाल्याने, सहा जिल्हयातील हजारो नागरिक आणि वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
या लढयात सहभागी असलेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरला एक मोठे गिफ्ट दिले आहे. उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, यासाठी मी सुध्दा पाठपुरावा केला होता.
या व्यापक लढयाला आणि माझ्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल मनापासून समाधान वाटते. अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.