ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन
schedule24 Nov 25 person by visibility 54 categoryसामाजिक
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे याच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. श्वसनाच्या त्रासामुळे ते बऱ्याच काळापासून आजारी होते. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. परंतु आज (२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली विले पार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
धर्मेंद्र यांचा चित्रपट कारकिर्द सात दशकांहून अधिक काळ गाजला, ज्यामध्ये त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये 'शोले', 'चुपके चुपके', 'सीता और गीता' आणि 'धरम वीर' यांचा समावेश आहे.