SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा : सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार राज्यात खळबळ! धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात 'एस.पी. गँग'वर कोल्हापुरात पहिलीच MCOCA कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपाताचा गोरखधंदा चालवणाऱ्या ११ जणांच्या मुसक्या आवळल्याडी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘टाटा स्किल्स’ सोबत सामंजस्य करारविभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजराएकल महिलांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरूकळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी मीना गौड यांची बिनविरोध निवडजगातील पहिली प्रवासी विमानसेवा: लंडन ते पॅरिससरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा : अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची माहितीपाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

मेडीकल, फिजिओथेरपी संघाना व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद; डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालय स्पर्धा

schedule24 Nov 25 person by visibility 389 categoryक्रीडा

कोल्हापूर  : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमध्ये डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज संघाने तर मुलींमध्ये डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी संघाने विजेतेपद पटकावले.

डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे २२ नोव्हेंबर रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या.  डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.राजेश ख्यालप्पा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

 यावेळी  विद्यार्थी विकास संचालक डॉ. अद्वैत राठोड, उपकुलसचिव संजय जाधव, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, डॉ. जगनाथ शेटे, सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व कॉलेजचे क्रीडा प्रमुख व खेळाडू उपस्थित होते.

या स्पर्धेत मुलांचे सहा संघ व मुलींचे पाच अशा एकूण 11 संघाचा सहभाग होत.  मुलांच्या गटात डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तर  मुलींमध्ये डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संघाने उपविजेतेपद मिळवले.

 कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ.राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes