SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाजपा जिल्हा कार्यालयास भेट महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीतसैन्यदलामध्ये अधिकारी पद- पूर्व प्रशिक्षण मोफत; इच्छुकांच्या 10 डिसेंबरला मुलाखतीप्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींसाठी मुदतवाढ द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधवमेडीकल, फिजिओथेरपी संघाना व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद; डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालय स्पर्धाटी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पेपर फुटीचे रॅकेटचा तपास : मुख्य आरोपीसह आणखीन 11 आरोपींना अटकडीकेटीईचे प्रा. वाय.एम. कांबळे यांना पी.एच.डी. प्रदानकोल्हापूर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा 2025 मध्ये कोल्हापूर जिल्हयाचे घवघवीत यशमहाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारे टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पुर्वीच पेपर फुटीचा प्रयत्न करणारे रॅकेट उघडकीसमहानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

जाहिरात

 

सैन्यदलामध्ये अधिकारी पद- पूर्व प्रशिक्षण मोफत; इच्छुकांच्या 10 डिसेंबरला मुलाखती

schedule24 Nov 25 person by visibility 62 categoryराज्य

कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी 15 ते 24 डिसेंबर या कालावधीत SSB कोर्स क्र. 64 आयोजित करण्यात आला आहे. या कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. 10 डिसेंबर रोजी मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी केले.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी डिर्पामेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (DSW) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी कोर्स क्र. 64 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. या एसएसबी (SSB) वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत. यामध्ये, कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एस.एस.बी.साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल training.petenashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाट्ॲप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes