SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटनाराज्यात उद्यापासून पावसाची शक्यता; 36 पैकी 23 जिल्ह्यांना यलो अलर्टराज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊसअभियांत्रिकी मधील करिअर भविष्यात कौशल्याधिष्ठित असणार : डॉ.मोहन वनरोट्टी; ११०० पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केआयटी आयोजित प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन संपन्न “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडाशंभूराजेचे मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात कोरे अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा १४ जूनला मुंबईतशेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनातून प्रगती साधावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

जाहिरात

 

शंभूराजेचे मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात

schedule08 Jun 25 person by visibility 225 categoryक्रीडा

कोल्हापूर : येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या वतीने वस्ताद कै. सुरज ढोली यांनी सुरु केलेली परंपरा कायम राखत आयोजित करण्यात आलेले शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात मुला-मुलींसोबत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.


शिबिरामध्ये लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे प्रशिक्षण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यासोबतच, सहभागींना नेमबाजी, मेडिटेशन, प्राणायाम आणि विविध साहसी खेळांचेही प्रशिक्षण मिळाले, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळाली.त्याच बरोबर शिवकालीन युद्धकलेचे महत्व त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे मुख्य काम शिबिरामुळे करण्यात आली


शिबिराच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विजय देवणे शिवसेना सहसंपर्क प्रमुख, अँड प्रसन्न मालेकर मुर्ति व मंदिर अभ्यासक, विनय पाटील ऑलमपिंक शुटिंग रेंज, विनोद कांबोज ज्येष्ठ गिर्यारोहक, अनिकेत जुगदार निर्यारोहक व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती त्यांनी मर्दानी खेळांच्या महत्त्वाची माहिती दिली आणि सहभागींचे कौतुक केले.सर्व पाहुण्याचे स्वागत अध्यक्षाच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले.

या शिबिरामुळे युवा पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि मर्दानी खेळांच्या परंपरेची माहिती मिळाली, तसेच शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली,याच उद्देशानी या शिबिरांचे आम्ही संस्थेच्या वतिने गेली १५ वर्षे आयोजन करीत आहोत असे अध्यक्षा शितल सुरज ढोली यांनी   सांगितले.

सुत्रसंचालन धनाजी उपारे यांनी केले व शिबिरा विषयी माहिती व आभार ज्योती जाधव यांनी मानले.
संस्थेच्या सर्व  प्रशिक्षकांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes