SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला‘डीकेटीईच्या मेकॅनिकलमधील विद्यार्थ्यांची टेस्ला या जगविख्यात कंपनीमध्ये भक्कम कामगिरी’कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कारदिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन नरके यांचे मार्गदर्शनभारतीय लोकशाहीचा पोलादी आराखडा: राष्ट्रीय नागरी सेवा दिनकोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

जाहिरात

 

‘डीकेटीईच्या मेकॅनिकलमधील विद्यार्थ्यांची टेस्ला या जगविख्यात कंपनीमध्ये भक्कम कामगिरी’

schedule21 Apr 26 person by visibility 104 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील माजी विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर मानाचा ठसा उमटवत नामांकीत टेस्ला या कंपनीत उल्लेखन्नीय कामगिरी करीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. या यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपध्दतीला, संशोधनात्मक दृष्टीकोनाला आणि उद्योगस्नेही प्रशिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. सुहास जाधव, वैभव भोईटे, निखील हुल्ले व अमोघ सहस्त्रबुध्दे हे मेकॅनिकल इंजिनिअरींगचे माजी विद्यार्थी सध्या टेस्लामध्ये विविध तांत्रिक जबाबदा-या सांभाळत असून त्यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर जागतिक उद्योगविश्‍वात ठसा उमटवला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत कामगिरी करत त्यांनी डीकेटीई व इचलकरंजीचे नाव जागतिक पातळीवर अभिमानाने उंचावले आहे.

टेस्ला ही अमेरिकास्थित इलेक्ट्रीक वाहन व स्वच्छ उर्जा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून इलेक्ट्रीक कार, उर्जा साठवण आणि सौरउर्जा तंत्रज्ञानात ती आघाडीवर आहे. अत्याधुनिक ऑटोमेशन, कृत्रिम बुध्दीमता आणि नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहायाने टेस्लाने जागतिक उद्योगविश्‍वात विशेष स्थान निर्माण केले आहे. डीकेटीई संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोजेक्ट आधारित शिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगसंलग्न अभ्यासक्रम, इंटरनशिप आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैध्दांतिक ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष उद्योगातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसीत होते. सॉफटवेअर, ऑटोमेशन, डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कौशल्याचा संगम साधत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट समस्या निराकरण क्षमता व नवउन्मेषक्षमता दृष्टीकोन सिध्द केला आहे.  

सध्याच्या वेगाने बदलणा-या औद्योगिक वातावरणात आंतरविद्याशाखीय कौशल्य असलेल्या अभियांत्यांची गरज मोठया प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर डीकेटीईने उद्योगांच्या गरजा लक्षात घेवून अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल केले असून, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांची अशा नामांकित कंपन्यामध्ये निवड होण्यास मदत होत आहे. डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील प्लेसमेंट हे अधिक बळकट होत आहेत. डीकेटीईचे सातत्यपूर्ण प्रयत्न,उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण यामुळेच विद्यार्थ्यांनी डीकेटीई टू ग्लोबल असा प्रवास साध्य केला आहे. हे यश भविष्यातील पिढयांसाठी प्रेरणादायी ठरत असून, संस्थेच्या जागतिक वाटचालीला नवी दिशा देणारी आहे.

या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,मानद सचिव डॉ. सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे,उपसंचालक डॉ.यु.जे पाटील, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.व्ही.आर. नाईक, टीपीओ जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes