रुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला
schedule21 Apr 26 person by visibility 120 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील तोहिद पठाण या तरुणाचा पंचगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास रुई येथील बंधाऱ्यावर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने तोहिद मोहरीतून वाहून गेला आणि बेपत्ता झाला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली होती, मात्र सोमवारी यश आले नाही. अखेर आज (मंगळवारी) सकाळी त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला असून, याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या घटनेमुळे यड्राव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.