डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांनींची अॅलेक्स मशिनटूल्स या कंपनीमध्ये निवड
schedule28 Aug 26 person by visibility 153 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील वैष्णवी आनंदाचे, प्रणाली सावंत आणि सोनाली लोटके या तीन विद्यार्थ्यांनींची अॅलेक्स मशीनटूल्स या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. विद्यार्थीनींच्या या यशामुळे डीकेटीईच्या उद्योगाभिमुख शिक्षणपध्दती पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.
अॅलेक्स मशीन टूल्स ही १९६४ पासून कार्यरत असलेली भारतातील उच्च अचूकता पृष्ठभाग ग्राइंडिंग मशीनच्या निर्मितीतील अघाडीची कंपनी आहे. अॅटोमोबाईल्स, एअरोस्पेस,बेअरिंग, टूल अॅण्ड डाय, इलेक्ट्रॉनिक्स, मशीन बिल्डींग यांसह विविध उद्योगांसाठी कंपनीकडून अचूक ग्राइडिंग सोल्यूशन्स उपलब्ध करुन दिली जातात. कंपनीच्या उत्पादनामध्ये आधुनिक सीएनसी तंत्रज्ञानाचा वापर तसेच अचूकता, सातत्य कार्यक्षमतेवर भर दिला जातो.
डीकेटीईच्या निवड झालेल्या विद्यार्थीनींनी इंडियन मशिन टूल मॅनुफॅक्चररर्स असोसिएशन पुणे येथे दोन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी अधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, मशीन टूल्स, अचूक अभियांत्रिकी, औद्योगिक उत्पादन प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष कार्यपध्दतींचे ज्ञान आत्मसात केले.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,मानद सचिव डॉ. सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे,मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.व्ही.आर. नाईक, टीपीओ जी.एस. जोशी, कोऑर्डीनेटर डॉ.बी.बी. कबनुरे यांचे मार्गदर्शन लाभले.