SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

डीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवड

schedule16 Jun 26 person by visibility 280 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरींग, अर्टिफिशियल इंटेलिजन्स अँण्ड मशिन लर्निंग तसेच अर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स विभागातील तब्बल ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर या तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्हुवद्वारे उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे.

मॅक्सीमस इन्फोवेअर ही ऑटोमेटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, एम्बेडेड सिस्टीम्स, पॉवरट्रेन कंट्रोलर्स, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान तसेच अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली विकसित करणारी अग्रगण्य भारतीय तंत्रज्ञान कंपनी आहे.

 नाविण्यपूर्ण संशोधन, उच्च दर्जाचे अभियांत्रिकी उपाय आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमतेमुळे कंपनीने अ‍ॅटोमोबाईल आणि ई मोबिलिटी क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे.


या कॅम्पस इंटरव्हयूवमधून डीकेटीईच्या कॉम्प्युटर विभागातून २२, एआयएमएल विभागातून ६ तर एआयडीएस इंजिनिअरींग विभागातून ३ अशा एकूण ३१ विद्यार्थ्यांना मॅक्सीमस इन्फोवेअर या कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेवून डीकेटीईमध्ये उद्योगाभिमुख शिक्षणावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक तंत्रज्ञान, प्रोग्रॅमिंग, कृत्रिम बुध्दिमता आणि डेटा सायन्स याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. तसेच तांत्रिकज्ञानाबरोबर संवाद कौशल्य, सादरीकरण कौशल्य आणि व्यक्तीमत्व विकासासाठी नियमित प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची उत्तम संधी मिळत असून डीकेटीईचे विद्यार्थी उद्योगविश्‍वात यशस्वीपणे आपले स्थान निर्माण करीत आहेत.

या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ.एस.के.शिरगावे, डॉ डी.व्ही. कोदवडे, डॉ टी.आय बागबान टीपीओ जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes