SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​"होमिओपॅथी, आयुर्वेद आणि योग महाविद्यालयांसह ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभाराव्यात."नीट परीक्षेत संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे राष्ट्रीय स्तरावर यशरोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा उत्साहातलोकशाहीर अण्णाभाऊ साठे: वंचितांच्या वेदनांचा बुलंद आवाजकरवीर तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनथकीत भाडे न भरलेल्या सहा गाळ्यांना महापालिकेचा सीलकृषी व कृषी संलग्न पदवी प्रवेशासाठी डी. वाय. पाटील कृषी संकुलात निशुल्क मार्गदर्शनकेआयटीची जागतिक झेप;वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी सामंजस्य करारकोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी: केंद्रीय आरोग्य योजनेत दोन खासगी रुग्णालयांचा समावेश; खासदार धनंजय महाडिकांच्या प्रयत्नांना यश"आयुष क्लिनिक" प्रथम वर्धापन दिन उत्साहात

जाहिरात

 

नीट परीक्षेत संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे राष्ट्रीय स्तरावर यश

schedule18 Jul 26 person by visibility 168 categoryशैक्षणिक

▪️मोहनीश भोसले 10 वा तर सार्थक पाटील 14 वा

कोल्हापूर :  संजय घोडावत IIT अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी  NEET 2026 मध्ये ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये मोहनीश भोसले  705/720 गुणांसह ऑल इंडिया रँक (AIR) 10 वा, तर सार्थक पाटील 705/720 गुणांसह  14 वा रँक मिळवून राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले.

   याबरोबरच साहिम पाटवेगार यांनी 690/720 गुणांसह AIR 106, श्रीवल्लभ गावडे यांनी 690/720 गुणांसह AIR 122, तर समीर जाधव यांनी 685/720 गुणांसह AIR 177 मिळवत संस्थेच्या यशात मोलाची भर घातली.

  याशिवाय मोहनीश भोसले, सार्थक पाटील, सहीम पटवेगार आणि समीर जाधव यांनी जीवशास्त्र (Biology) विषयात 360 पैकी 360 गुण मिळवत विशेष प्रावीण्य संपादन केले.विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्थेचे अनुभवी शिक्षक, नियोजनबद्ध अध्यापन, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांसाठीची प्रभावी तयारी यांचा मोठा वाटा असल्याचे संस्थेने सांगितले.

     विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक  वासू, केंद्रप्रमुख  गुप्ता तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes