सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या; शपथविधी संपन्न
schedule31 Jan 26 person by visibility 242 categoryराज्य
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज शनिवारी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यांचे पती अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या.
आज विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली, यामध्ये एकमताने सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली होती.
त्यांनी त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत.