SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात ‘तंत्रज्ञान स्त्रोत केंद्रा’चे थाटात उद्घाटनअखिल भारतीय कनोईंग व कयाकिंग स्पर्धांना सांगलीत उद्यापासून प्रारंभनाटो (NATO): जागतिक सुरक्षिततेचे अभेद्य कवच आणि ७७ वर्षांचा प्रवासरंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागरसी. पी. आर. चे नूतनीकरण एप्रिल अखेर पूर्ण करून एक मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देशपोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीरससेगाव येथे २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

जाहिरात

 

सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात ‘तंत्रज्ञान स्त्रोत केंद्रा’चे थाटात उद्घाटन

schedule04 Apr 26 person by visibility 120 categoryउद्योग

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘तंत्रज्ञान स्त्रोत केंद्रा’चे उद्घाटन सिद्धगिरी मठाचे परम पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (परभणी) कुलगुरू डॉ. इंद्रमणी, संशोधन अभियंता डॉ. डी. डी. टेकाळे आणि पशु विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, द्वारका जुना अखाड्याचे जगद्गुरू कृष्णानंद देव गिरी यांनीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावून मार्गदर्शन केले.

हे केंद्र भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (ICAR) अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत स्थापन करण्यात आले असून, याद्वारे पशुसंवर्धनासाठी यांत्रिकीकरण योजनेवर भर दिला जाणार आहे. बैलचलित आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी क्षेत्रातील नव्या संशोधनाचा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. पारंपरिक शेतीला शाश्वत आणि आधुनिक बनवण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण दुवा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला परिसरातील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन तंत्रज्ञान स्त्रोत केंद्रामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी औजारे आणि बैलचलित यंत्रांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes