SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागरसी. पी. आर. चे नूतनीकरण एप्रिल अखेर पूर्ण करून एक मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देशपोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीरससेगाव येथे २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजलीकोल्हापुरात 'गुड फ्रायडे' निमित्त ख्रिस्ती बांधवांकडून विशेष प्रार्थना; चर्चमध्ये भाविकांची गर्दीशिधावाटप विभागाचा मोठा धडाका! वैजापूर रोडवर LPG चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्तगुड फ्रायडे : त्याग, क्षमा आणि करुणेचा दिवसभक्ती आणि उत्साहाचा सोहळा! कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव मोठ्या उत्साहात

जाहिरात

 

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

schedule03 Apr 26 person by visibility 80 categoryराज्य

कोल्हापूर : गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत असून, रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासह खवय्यांचीही गर्दी होत आहे. या परिसरातील स्थानिक नागरिक याच उदरनिर्वाहावर अवलंबून आहेत. परंतु, रंकाळाचे विद्रुपीकरण करून, सौंदर्यात बाधा येत असेल तर त्यास आपण पाठीशी घालणार नाही, रंकाळा तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे प्रसिद्धीपत्रक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

यात पुढे म्हंटले आहे कि, काही दिवसांपूर्वी रंकाळा तलाव परिसरातील नागरिकांनी सदर ठिकाणी फेरीवाले संघटना स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सदर संघटनेच्या उद्घाटनाकरिता सदर ठिकाणी गेलो असता सांगण्यात आलेली बाब आणि प्रत्यक्षात करण्यात आलेली कृती वेगळी असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अतिक्रमणास कोणत्याही प्रकारे मी मान्यता दिली नाही. यावेळी स्थानिक नागरिकांनी परप्रांतीय लोक याठिकाणी व्यवसाय करतात. या ठिकाणी गाळे घेवून व्यवसाय करण्यास मर्यादा असल्याचे गाऱ्हाणे मांडले. *रंकाळा तलाव ही कोल्हापूरची अस्मिता आहे. नागरिकांनाही व्यवसायासाठी योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येईल. परंतु, सौंदर्याला बाधा पोहचेल असे कोणतेही अतिक्रमण करू नये, अशा सूचना संबधित स्थानिक नागरिकांना दिल्या आहेत.

 आगामी काळात अशा प्रकारचे कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपूर्वी रंकाळ्यात कचरा, नासाडी झालेले अन्न टाकण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. याबाबतीतही आपण संबधितांची बैठक घेवून तलावाचे कोणतेही नुकसान किंवा प्रदूषण फेरीवाल्यांच्या कृतीमुळे होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. रंकाळा तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासह निधीच्या माध्यमातून असेल, नाविन्यपूर्ण अशी विद्युत रोषणाई, म्युझिकल फौंऊटेन, सेल्फी पाँइंट आदी प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीसाठी आपले नेहमीच प्रयत्न सुरु आहेत. पूर्वीचा रंकाळा आणि आताच रंकाळा यात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी या पत्रकात म्हंटले आहे..

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes