महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक : आमदार सतेज पाटील
schedule10 Mar 25 person by visibility 292 categoryराजकीय

कोल्हापूर : महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक आहे महाराष्ट्राच्या जनतेची घोर निराशा केली आहे. या अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींचा, कर्जाखाली पिचलेल्या शेतकऱ्यांचा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला आहे. अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
लाडक्या बहिणींचा २१०० रुपयांचा वायदा, ग्रामीण महाराष्ट्राचा विकास, राज्यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर, महिला सुरक्षेबाबत ठोस उपाय आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था, अशा अनेक मुद्द्यांना महायुती सरकारने पद्धतशीर बगल दिली आहे.
हा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या घोषणा आणि दिशाभूल करणाऱ्या योजनांचा परिपाक आहे. अशी टीका विधानपरिषद काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.