SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात निरोगी महाराष्ट्र - सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरस्वातंत्र्य दिनानिमित्त सर्किट बेंच येथे ध्वजारोहण समारंभ महा-पल्स एआय आणि ‘आशा साथी’मुळे कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला डिजिटल बळकटी : पालकमंत्री कोल्हापूर: सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन ‘गोकुळ’ मध्ये उत्साहात शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण; तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसादडीकेटीईकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा धनादेश सुपुर्तचोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदी

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेतील 'या' नगरसेवकांचे पद धोक्यात; जातीचा दाखला अवैध ठरल्याने खळबळ

schedule29 Jun 26 person by visibility 464 categoryराजकीय

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय उर्फ रिंकू   देसाई यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याने त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

रिंकू देसाई हे प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपच्या वतीने निवडून आले होते. मात्र, त्यांनी 'कुणबी' या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती. आज, जात पडताळणी कार्यालयाने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला आहे. यामुळे त्यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांचे नगरसेवक पद आता धोक्यात आले आहे.

या संदर्भात  रिंकू देसाई हे  या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे समजते. मात्र, या निर्णयामुळे कोल्हापूर महापालिकेतील भाजपला मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, केवळ देसाईच नव्हे, तर अजूनही अनेक नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात  आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes