संजय घोडावत इन्स्टिट्यूट, डिप्लोमा इंजिनिअरिंग “हिवाळी परीक्षेत उच्चांकित निकालाची परंपरा कायम”
schedule07 Jan 26 person by visibility 218 categoryशैक्षणिक
▪️डिप्लोमा इंजिनिअरिंग “पॉलिटेक्निक” विभागाच्या ११ विषयातील निकाल १०० टक्के, ४५ विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण संपादन
▪️४ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी १०० गुण संपादन करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या यादीमध्ये इन्स्टिट्यूटचे नाव संपादित
कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील डिप्लोमा इंजिनिअरिंग “पॉलिटेक्निक” विभागाच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत संस्थेची उच्चांकी निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
प्रथम वर्ष :मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून वड्ड आदित्य सचिन ९०% , सुडके श्रेया देवदास ८८.९४% थोरात नेहा अरुण ८८.७% यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात घुले संजना श्यामकुमार ९४.७१% , महामुनी निलांजली निलेश ८९.५३% व जाधव विराज विनायक ८६.२४% यांनी क्रमांक पटकावले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात पवार वैष्णवी संतोष ८९.८८% , राऊत वैभव विश्वनाथ ८७.१८% व शिंदे सोनिया उत्तम ८७.०६% यांनी यश मिळवले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पटेल अलीशा आरिफ ८७.४१% , भुसन्ना समीक्षा महेश ८७.१८% व सरोदे श्रावणी सदाशिव ८६.४७% यांनी गुण मिळवले, तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात भोपळे अथर्व अभिजीत ९०% , खंदारे अवधूत दिलीप ९०% , घोरपडे अथर्व राजेंद्र ८९.८८% व पाटील श्रेया ८९.६५% यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
द्वितीय वर्ष : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातून जाधव साक्षी विठ्ठल ८८.२४%, पाटील रितेश महेश ८७.५३% व साळोखे यशराज महेश ८५.८८% यांनी क्रमांक मिळवले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात पवार ईशान चेतन ९४.६७%, तनुगडे प्रणव राजू ९२.८९% व पटेल कुणाल वसंत ९१.७८% यांनी उत्तम यश मिळवले. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात कांबळे प्रेम विजय ८९.५३%, सिंग सत्यम अवधेश ८२.३५% व सक्षम अमर कांबळे ८१.७६% यांनी कामगिरी केली. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात यादव कल्याणी सतीश ९४.५९% , वड्ड अदिती सचिन ९३.०६% व गवळी जान्हवी अनिल ९२.२४% यांनी गुण मिळवले, तर ई अँड टीसी विभागात जाधव श्रेया जयवंत ९१.५६% , जगताप सिद्धेश देवानंद ९०.३३% व कुलकर्णी श्रेयश ८५.४४% यांनी यश संपादन केले.
तृतीय वर्ष : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात ओंकार विजय खंदारे ९४%, खोपकर सौरभ विजय ९१.१८% व जाधव निशीराज रावसाहेब ८९.४१% यांनी अव्वल स्थान मिळवले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात पवार राज प्रीतम ९१.५३%, सनगर निरंजन राहुल ९१.४१% व देसाई रामराजे गजानन ८८.८२% यांनी यश मिळवले. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात लागू अखिलेश विकास ९०.८९% , पाटील अथर्व ८८.४४% व होळकुंदे धिरज प्रभुनाथ ८८.११% यांनी कामगिरी केली. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात नेवगे श्रावणी मधुकर ९७.७७% , पाटील मानाली राजेंद्र ९७.५३% व खोराटे ऐश्वर्या सूर्यकांत ९५.७६% यांनी घवघवीत यश संपादन केले, तर ईअँडटीसी विभागात चौगुले फरहीन अशफाक ९३.४१% , रेले काव्या धर्मप्रसाद ९२.७१% व शिंदे सृष्टी राहुल ८९.२९% यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. असी माहिती पॉलिटेक्निक अकॅडमीक डीन प्रा रविंद्र धोंगडी यांनी दिली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी अभिनंदन करून अकॅडमीक डीन सर्व विभागाचे विभाग प्रमुख, परीक्षा विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य दिशा देणाऱ्या मार्गदर्शनामुळे हा उज्वल निकाल लागल्याची भावना व्यक्त करण्यात आली. भविष्यातही अशीच यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी गुणवत्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

