SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये : डॉ. सी. डी. लोखंडे तिसऱ्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील आठव्या स्थानी प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता; 'या' संकेतस्थळांवर पाहता येणारविद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलकृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरअधिकाऱ्यांनो, जनतेचा अंत पाहू नका; २७ जूनपर्यंत पाणी न मिळाल्यास गाठ आमच्याशी आहे!पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी आमदार यड्रावकर यांना निवेदनके.एम.टी.सवलत पास वितरण केंद्राच्या वेळेत बदल​कोल्हापूर मनपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; ६ दिवसांत २९९ विनानोंद मिळकती शोधल्या!इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणारमुख्याध्यापिका सविता पाटील यांना राज्यस्तरीय 'आयडियल टीचर' पुरस्कार प्रदान

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये : डॉ. सी. डी. लोखंडे तिसऱ्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील आठव्या स्थानी

schedule07 May 26 person by visibility 64 categoryशैक्षणिक

🔸पदार्थ विज्ञान मधील संशोधन कार्याचा गौरव 

कोल्हापूर : पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या दोन संशोधकाने ‘टॉप टेन’ मध्ये स्थान मिळवले आहे. रिसर्च डॉट  कॉम या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन मूल्यमापन संस्थेने जाहीर केलेल्या या यादीत सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता डॉ. सी.  डी. लोखंडे तिसरे तर  संशोधन संचालक डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी आठवे स्थान मिळवले आहे.  

रिसर्च डॉट कॉम च्या अहवालानुसार, देशातील अव्वल संशोधकांची निवड डी  इंडेक्स, संशोधनपत्रांची गुणवत्ता, संदर्भ, आणि संशोधन क्षेत्रातील प्रभाव या निकषांवर करण्यात आली. डॉ. चंद्रकांत डी. लोखंडे यांचा डी  इंडेक्स,  108 असून त्यांच्या संशोधन कार्याला 41 हजार 764 हून अधिक संदर्भ प्राप्त झाले आहेत. जागतिक क्रमवारीत त्यांचा  725 वा क्रमांक आहे. तर डॉ. प्रमोद एस. पाटील यांचा डी  इंडेक्स 91 असून त्यांच्या संशोधनाला 29 हजार 160 हून अधिक संदर्भ मिळाले आहेत.

 जागतिक स्तरावर त्यांना 1554 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाचे संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनीही या यादीत 185 वे स्थान मिळवले आहे. त्यांचा डी इंडेक्स 49 असून  त्यांच्या संशोधनाला 6941 संदर्भ मिळाले आहेत

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाने संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यापीठातील संशोधकांनी ऊर्जा, नॅनोतंत्रज्ञान, सुपरकॅपॅसिटर, सौरऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञान आणि आधुनिक पदार्थ विज्ञान या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संशोधन केले असून अनेक संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट नोंदविण्यात आले असून संशोधनाधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख तंत्रज्ञान विकासावर विद्यापीठाचा विशेष भर राहिला आहे. संशोधनपर शेकडो शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.

या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन करताना सांगितले की, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संशोधन आणि नवसंकल्पनांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. डॉ. सी. डी. लोखंडे आणि डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी मिळवलेले हे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून संशोधन  कार्याला  आणखी  गती मिळेल. संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील.

रिसर्च डॉट कॉम ने यंदाच्या मानांकनासाठी OpenAlex, CrossRef यांसह विविध आंतरराष्ट्रीय डेटाबेसमधील माहितीचा आधार घेतला. देशातील 263 मटेरियल्स सायन्स संशोधकांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली. संशोधकांच्या शैक्षणिक योगदानासोबतच त्यांच्या संशोधनाचा समाज आणि विज्ञान क्षेत्रावर झालेला प्रभावही विचारात घेण्यात आला.

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील , विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ.  राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही . व्ही . भोसले  यांनी डॉ. लोखंडे आणि डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले.

🟣 रिसर्च डॉट कॉम च्या यादीत मिळालेली क्रमवारी हे निश्चितच संशोधन कार्याची पावती आहे. या क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी स्वस्त ने केलेले सहकार्य व पाठिंबा व संशोधक विद्यार्थ्यांचे परिश्रम तितकेच महत्त्वाचे आहेत 
✍️ डॉ. सी. डी. लोखंडे


🟣चार दशकांच्या समृद्ध,  समर्पित अणि प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास अर्थपूर्ण कर्तृत्वात परावर्तित होताना पाहून समाधान वाटते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त,  कुलगुरू तसेच संशोधक विद्यार्थी, कुटुंबिय व थोर व्यक्तीनी माझ्यावर टाकलेला विश्वास, सहकार्य व पाठबळ यामुळेच हे यश प्राप्त होऊ शकले.
✍️ डॉ. प्रमोद एस. पाटील

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes