महेच्या विरेंद्रची विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट; ग्रामीण भागातून उल्लेखनीय यश
schedule03 May 25 person by visibility 694 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : महे (ता. करवीर) गावचा रहिवासी आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग (तृतीय वर्ष) चा विद्यार्थी विरेंद्र राजाराम मिठारी याची एकाच वेळी विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेनिमित्त इन्स्टिट्यूट आणि ग्रामपंचायतीच्या वतीने महे येथे सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागात राहून उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कमिन्स इंडिया लिमिटेड; पुणे, भारत फोर्ज लिमिटेड; पुणे, मदरसन ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजीज अँड इंजिनिअरिंग लिमिटेड; पुणे, ब्रेमो ब्रेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड; पुणे या कंपन्यांमध्ये विरेंद्रची प्लेसमेंट झाली. चारही कंपन्यांनी त्याला आकर्षक पॅकेजेस ऑफर केली आहेत . याप्रसंगी बोलताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी , "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक जगाची आव्हाने पेलण्याची क्षमता असून इन्स्टिट्यूटद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा" असे प्रतिपादन केले. विरेंद्रच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास महे गावच्या सरपंच सुवर्णा पाटील यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी इन्स्टिट्यूटद्वारे राबवल्या जात असणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
विरेंद्रला संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच शामराव कुंभार , भैरवनाथ सेवा सोसायटीचे चेअरमन , व्हा. चेअरमन, महे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, पालक, विदयार्थी , मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. ए आर नदाफ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी एस खाडे , संभाजी पोवार उपस्थित होते. प्रा. सुदर्शन महाडिक यांनी सूत्रसंचालन केले.