SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देशगुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुःख व्यक्तएअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित"डेटा" हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन - श्रीनिवास पी. एम; डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘पॉवर बी. आय.’ कार्यशाळा उत्साहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून विमान दुर्घटनेची गंभीर दखल; अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजलीअहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यूआषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कारमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून

जाहिरात

 

कोल्हापूर शहराला गुरुवारपासून पुर्ववत पाणी पुरवठा; महापालिकेच्यावतीने 21 टँकरद्वारे 63 फे-या

schedule11 Jun 25 person by visibility 188 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरामध्ये आज 21 टँकरद्वारे 63 फे-याद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. काळम्मवाडी योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा बंद असल्याने महापालिकेच्या 4 व खाजगी 17 टँकरद्वारे शहरातील विविध भागामध्ये पाणी पुरवठा करण्यात आला. काळम्मावाडी योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्री पुर्ण होऊन रात्रीच काळम्मावाडी येथून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा झाला असून गुरुवारपासून शहराला पुर्ववत पाणी पुरवठा सुरु होणार आहे.

शहरामध्ये आज महापालिकेच्या 4 टँकरक्षरे 15 फे-या व खाजगी 17 टँकरद्वारे 48 फे-या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने मंगळवार पेठ परिसर, शिवाजी पेठ परिसर, सुभाषनगर, रायगड कॉलनी, योगेश्वरी कॉलनी, वारे वसाहत, टिंबर मार्केट, गवत मंडई, राजाराम चौक, शहाजी वसाहत, साळोखेनगर, संभाजीनगर, उद्यमनगर, मंगेशकर नगर परिसर, वर्षानगर परिसर, कणेरकर नगर, सानेगुरुजी वसाहत, राजलक्ष्मीनगर, शिवगंगा कॉलनी, एन.टी.सरनाईक कॉलनी, शाहु बँक परिसर, पाटाकडील तालीम, सुब्राव गवळी तालीम परिसर, मंडलिक वसाहत, किर्ती हौसिंग सोसायटी, ई वॉर्ड मातंग वसाहत, रघुनाथ चौक - राजारामपुरी, निंबाळकर चौक, कोरगावकर कंपाऊंड - सदर बाजार, शिवाजी पार्क, कदमवाडी, लोणार वसाहत, टाकळा, राजारामपुरी, भारत नगर, राजेंद्र नगर,

 गोळीबार मैदान, उलपे मळा कसबा बावडा, वृषाली हॉटेल शेजारी, कनानगर ताराबाई पार्क, कपूर वसाहत कदमवाडी, लाईन बाजार, नागाळा पार्क, बापट कॅम्प इत्यादी ठिकाणी एकूण 21 टँकरने एकूण 63 फे-या करून शहर व उपनगरामध्ये पाणी पुरवठा करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes