SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : गावठी 11 हातभट्टीवर छापा; 3,37,160/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्तडी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी - मार्टमध्ये निवडस्वच्छ भारत अभियान 2024-25 चा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावाकोल्हापूर महानगरपालिका : प्रशासकांच्या बैठकीला उशिरा येणा-या 11 अधिकाऱ्यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपातगतिशीलता आणि स्वावलंबन हा गांधींचा चरख्यामागील विचार: डॉ.सुनीलकुमार लवटे; शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधींवरील दोन पुस्तकांचे प्रकाशनज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील रोखठोक व्यक्तिमत्व हरपले...अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी 28 फेब्रुवारी अखेर पूर्ण करा; अन्यथा...38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25; महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सुवर्णभरारीविद्यापीठात दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधींसह हुतात्म्यांना अभिवादन‘होय होय वारकरी’ पुस्तकात वारकरी परंपरांचा चिकित्सक वेध: प्रा. प्रवीण बांदेकर

जाहिरात

 

स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची : डॉ. विलास शिंदे

schedule30 Jan 25 person by visibility 189 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : स्त्री भ्रूण हत्या रोखण्यामध्ये महिलांची फार महत्त्वाची भूमिका आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचे ‘बेटी बचाओ अभियान’ आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता ‘राष्ट्रीय बालिका दिना’निमित्त वैद्यकीय गर्भपात कायदा आणि पोक्सो कायदा या अनुषंगाने जागृती करण्यासाठी नुकतीच एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. 

कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, विद्यार्थी-विद्यार्थिनींना या कायद्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक संतुलनासाठी स्त्री-पुरूष गुणोत्तर जपणे आणि कोणत्याही मुलीची गर्भातच हत्या न होऊ देणे, यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या स्तरावर दक्षता घेतली पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये, समाजात त्याविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पुढाकार महत्त्वाचा आहे. 

समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार म्हणाल्या, कौटुंबिक स्तरावर मुलांचे संगोपन करीत असताना त्यांच्यात मुलगा-मुलगी असा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला स्थान देता कामा नये. 

विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांनी प्रत्येक गावामध्ये या दोन्ही कायद्यांबाबत जागरूकता वाढण्याचा प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले. 


कार्यशाळेत अॅड. गौरी पाटील यांनी वैद्यकीय गर्भपात कायद्याविषयी तर आणि समाजसेविका गौरी हसूरकर यांनी पोक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुप्रिया वडर आणि योगेश कर्चे यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश ब्राम्हणे आणि डॉ. योजना पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes