SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यज्ञ फौंडैशन यांच्याकडून 75 क्षयरुग्ण दत्तकउंचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनरस्ते अपघात रोखण्यासाठी 'अल्कोहोल' सोबतच आता 'ड्रग्स' सेवन तपासणीही करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईककेआयटीमध्ये गुरूवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यानकेआयटी ला आयएसटीई चा ‘बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट’ हा पुरस्कार प्राप्तआंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागासाठी डॉ. प्रभंजन माने फ्रान्सला रवानाआचार्य अत्रे विशेषांक: वाचनीय व संग्राह्यडॉ. बापूजी साळुंखे इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये बी.टेक अभियांत्रिकीच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साही प्रारंभकोल्हापूर: घरफाळा थकबाकीपोटी घरफाळा विभागाकडून 6 मिळकतीवर सीलची कारवाईकोल्हापूर: उमा टॉकीज येथील हॉटेल कृष्णाने विद्युत मोटर लावून पाणी वापरत असल्याचे तीन नळ कनेक्शन खंडीत

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात १२ मार्चला शरण अध्यासनातर्फे कार्यशाळा

schedule10 Mar 25 person by visibility 171 categoryशैक्षणिक

 ‌‌‍‍कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ येथील शरण साहित्य अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या वेळेत भौतिकशास्त्र अधिविभाग सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. कार्यशाळेचा मुख्य विषय ‘भारतीय महिला : जात-वर्ग-लिंगभाव जाणीव’ हा आहे. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त मा. के. मंजूलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत. तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थान भूषवतील. 

ई. एफ. एल. युनिव्हर्सिटि, हैद्राबादच्या माजी प्र. कुलगुरू प्रा. डॉ. माया पंडित आणि सेंट्रल युनिव्हर्सिटि ऑफ कर्नाटका, गुलबर्गा येथील प्रा. डॉ. शिवगंगा रूम्मा या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक असतील.

  सदर कार्यक्रमात व्याख्याना सोबतच महिला विषयक निवडक आंतरराष्ट्रीय लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. उमेश मालन दिग्दर्शित 'गोल्डन टॉयलेट' हा मराठी लघुपट, फजिल रझाक दिग्दर्शित 'पिरा' हा मल्याळम लघुपट तसेच समता जाधव दिग्दर्शित 'सोच सही, मर्द वही' हा हिंदी लघुपट दाखविण्यात येणार आहे. या लघुपटांविषयी डॉ. अनमोल कोठाडिया उपस्थितांशी संवाद साधतील.

या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विवेक वाहिनीचे विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन शरण साहित्य अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी आणि विवेक वाहिनी, कोल्हापूरच्या जिल्हा कार्यवाह डॉ. चैत्रा राजाज्ञा यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes