SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; 'या' विषयावर सकारात्मक चर्चाआयआयसीटी फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीस्वयंपूर्ण होण्यासाठी पुनर्वसन केंद्रातून मुला-मुलींना चांगल्या सेवा आणि शिक्षण द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगेसार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयासाठी दर्जेदार दिवाळी अंक, कवितासंग्रह, कथासंग्रह भेट देणार : डॉ. सुनीलकुमार सरनाईकअंबाई टॅंकची दुरुस्ती करा : 'आप'चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन उचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात ‘टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना : उद्योजक सारंग जाधव; डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजन जिल्ह्यातील तीन लाख मुलींना एचपीव्ही लस देण्यासाठी नियोजन करा : मंत्री, हसन मुश्रीफहोळी : आनंद, सौख्य, उत्साहपूर्ण सणपालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख

जाहिरात

 

कोल्हापूर येथून ठार मारण्याच्या उद्देश्याने अपहरण केलेल्या तरूणाची मिरज येथून सुटका, तीन आरोपी अटक

schedule11 Feb 25 person by visibility 657 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कोल्हापूर येथून ठार मारण्याचे उद्देश्याने अपहरण केलेल्या तरूणाची मिरज, जि. सांगली येथून सुखरुप सुटका करण्यात आली.  याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण, कोल्हापूर शाखेने केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन दिनकर आडसुळ वय 55 वर्षे रा. निगवे दुमाला, ता. करवीर याचा मुलगा  विशाल मोहन आडसुळ वय 26 रा. भुये, ता. करवीर, जि. कोल्हापूर यास दि. 09 फेब्रुवारी रोजी रात्रौ 09.15 चे सुमारास भुयेवाडी कमानीजवळून, ता. करवीर येथून अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाकरीता अपहरण करुन चारचाकी गाडी मधून नेले आहे. अशी तक्रार करवीर पोलीस ठाणे येथे दिली तक्रारीवरून करवीर पोलीस ठाणे येथे  गुन्हा दाखल केला आहे.

सदरचा अपहरणाचा गुन्हा दाखल झालेनंतर गुन्ह्याचे घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन अपहरण झालेली व्यक्ती ही सुस्थितीत मिळणेकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व करवीर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना त्यांचेकडील तपास पथके तयार करून सर्वतोपरी प्रयत्न करुन लवकरात लवकर अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेणेसह गुन्हा उघडकीस आणणेच्या दृष्टीने सुचना देवून योग्य ते मार्गदर्शन केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्था.गु. शाखेकडील 03 तपास पथके तयार करुन विशाल मोहन आडसुळ याचे अपहरण केलेले ठिकाणापासून कोल्हापूर, सांगली जिल्हा परिसरात स्थानिक लोकांना सोबत घेवून झाडीझुडपे, ऊसशेती, डोंगर, निर्जन ठिकाणी अशी सर्व ठिकाणे पिंजून काढून अपहरण झाले व्यक्तीचा अविरतपणे शोध घेणेचे काम चालू केले. सदरचा गुन्हा दाखल झालेपासून अपहरण झालेले व्यक्तीचा अविरतपणे शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथकातील पो. हे. कॉ.  रामचंद्र कोळी यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील अपहरीत व्यक्ती विशाल मोहन आडसुळ याचे अपहरण श्रीकृष्ण महादेव कोकरे रा. कुपवाड, मिरज, सांगली याने त्याचे साथीदारासह मिळून केले आहे. तसेच श्रीकृष्ण महादेव कोकरे हा सांगली येथे आहे, अशी बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथक सांगली येथे रवाना होवून अंकली पुल, जि. सांगली येथे श्रीकृष्ण महादेव कोकरे व.व. 45, रा. वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली यांस सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अपहरीत व्यक्तीबाबत तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.

 तसेच सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे आणखीन ६ साथीदारासह केला आहे अशी माहीती दिली. तसेच अपहरीत व्यक्ती विशाल मोहन आडसुळ याचे भुये, ता. करवीर येथून अपहरण करून त्यास वेधस अपार्टमेंट, मिरज कोर्टच्या मागे, मिरज, जि. सांगली येथे कोंडून ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर श्रीकृष्ण कोकरे याचेसह वेधस अपार्टमेंट, मिरज येथे जावून पाहीले असता तेथील फ्लॅटला कुलूप असल्याचे दिसुन आलेने सदरचे कुलूप व दरवाजा तोडुन आत प्लॅटमध्ये पाहणी केली असता अपहरीत व्यक्ती विशाल आडसुळ यास दोरीने बांधलेले व जबर मारहाण केली असल्याने तो जखमी असल्याचे दिसुन आले. त्याची सुटका करून त्यास औषधोपचारासाठी एका पथकासोबत कोल्हापूर येथे रवाना केले. तसेच मिरज येथे इतर आरोपींचा शोध घेतला असता आरोपी नामे धीरज उर्फ हणमंत नामदेव पाटील व.व.56, रा. कवटे पिरान, ता. मिरज, जि. सांगली व राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी व.व.33, रा. कुपवाड एमआयडीसी, ज्ञानगिरी वसाहत, सावळी, ता. मिरज, जि. सांगली हे मिळुन आलेने त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्याचेकडे विचारणा केली असता श्रीकृष्ण कोकरे याची मुलगी श्रुती हिची विशाल आडसुळ याचेशी इंस्टाग्रामवर ओळख होवून 7 महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह होता. त्यांना तो प्रेमविवाह मान्य नसल्याने त्यांनी त्यास मारणेचे उद्देशाने अपहरण केले असल्याचे सांगितले. तसेच त्यांचे कब्जातुन गुन्ह्यात वापरलेली कार व एक मोटारसायकल असा एकुण 4,30,000/-रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशाल मोहन आडसुळ यांस औषधोपचाराकरीता   कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच आरोपी  1) श्रीकृष्ण महादेव कोकरे व.व.45, रा. वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली २) धीरज उर्फ हणमंत नामदेव पाटील व.व.56, रा. कवटे पिरान, ता. मिरज, जि. सांगली, 3) राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी व.व.33, रा. कुपवाड एमआयडीसी, ज्ञानगिरी वसाहत, सावळी, ता. मिरज, जि. सांगली यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता करवीर पोलीस ठाणे येथे रिपोर्टाव्दारे हजर केलेले आहेत. उर्वरीत 04 आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक,  महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक  शेष मोरे, पोलीस अंमलदार अमोल कोळेकर, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, संदीप बेंद्रे, लखन पाटील, अमित सर्जे, रूपेश माने, महेंद्र कोरवी, सागर माने, हंबीर अतिग्रे, राजू येडगे, युवराज पाटील, अमित मर्दाने यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes