उदगाव येथे युवकाचा खून; दोन संशयित आरोपींना अटक
schedule09 Feb 25 person by visibility 358 categoryगुन्हे

जयसिंगपूर : उदगाव येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर खोत पेट्रोल पंपालगत विपुल प्रमोद चौगुले (वय २० रा. जैन बस्ती जवळ उदगाव) याचा खून झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली.या खुनाच्या घटनेने उदगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
जुन्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. या खून प्रकरणी संशयित आरोपी अनिकेत मोरे व नागेश जाधव दोघे रा. बेघर वसाहत यांना जयसिंगपूर पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे.
दरम्यान घटना घडल्यानंतर मृत विपुल यास सांगलीच्या सरकारी रुग्णाला दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.