SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणकोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सील

जाहिरात

 

आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

schedule15 Oct 25 person by visibility 385 categoryराज्य

▪️सन २०२५-२६ खरेदी हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने बैठक

कोल्हापूर : शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा आणि त्यांना शेतीमाल विक्रीसाठी सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. यंदाच्या २०२५-२६ खरेदी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. धान, नाचणी आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर सोयीस्कर सुविधा मिळावी, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

▪️जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही योग्य दर आणि धानासाठी अतिरिक्त बोनस मिळावा, यासाठी नवीन खरेदी केंद्रे प्रस्तावित करणे गरजेचे आहे. यंदा धानाला २,३६९ रुपये, रागीला ४,८८६ रुपये आणि सोयाबीनला ५,३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निश्चित झाला आहे. या बैठकीत पणन महासंघाला सर्व तालुक्यांमध्ये धान्य खरेदी केंद्रांसाठी उपअभिकर्ता संस्थांची नेमणूक करण्याचे निर्देश देण्यात आले. इच्छुक सहकारी तालुका खरेदी-विक्री संघ, सहकारी संस्था आणि फार्मर प्रोड्युसर संस्थांना पणन महासंघाच्या अटी व निकषांनुसार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी शेतकरी आणि संस्थांनी जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नीलकंठ करे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे, पणन महासंघाच्या संचालिका धनश्रीदेवी घाटगे यांच्यासह जिल्ह्यातील सहकारी खरेदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे यांनी गाव पातळीवर महसूल विभागाच्या सहाय्याने हमीभाव केंद्रांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी ‘पीक पाहणी’ पोर्टल तसेच शासनाच्या विविध ऑनलाइन व्यासपीठांवर नोंदणी करून आपला शेतमाल हमीभावाने विक्रीसाठी सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाइल नंबर आणि पिकाची माहिती यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतील. ऑनलाइन नोंदणीसाठी OTP पडताळणी आणि आधार/e-KYC प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट करावा लागेल.

शेतकऱ्यांनी हमीभाव मिळावा म्हणून काय करा

•नोंदणी: जवळच्या अधिकृत प्रस्तावित केंद्रावर किंवा ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करा.

•कागदपत्रे: आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक आणि पिकाची माहिती तयार ठेवा.

•संपर्क व माहिती साठी : कृषी सहायक, तलाठी, तालुका कृषी विभाग, तहसील कार्यालय किंवा जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes