SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

द्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

schedule16 Jun 26 person by visibility 288 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त न्यू द्वारकानाथ कपूर विद्यालय, गंजीमाळ येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित  जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना नवीन शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडा लोंढे प्रमुख उपस्थित होते.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे मनोबल उंचावले. तसेच सभापती सत्यजित जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश आणि विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी मुख्याध्यापिका  मिनाक्षी चौगले, सहशिक्षिका  स्नेहलता बरगे, सहशिक्षक  चंद्रकांत पाटील, सेवक शिवाजी पाटील यांच्यासह पालक, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला. शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes