मुरगूड येथे रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धा
schedule08 Sep 25 person by visibility 231 categoryक्रीडा

कोल्हापूर : अनुज् चेस ॲकॅडमीच्या वतीने एक दिवशी १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. 14 सप्टेंबर रोजी मुरगूड विद्यालय (ज्यू कॉलेज), मुरगूड (नवीन हॉल) येथे ही स्पर्धा होईल. स्पर्धा १६ वर्षांखालील (जन्म तारीख : १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर), १४ वर्षांखालील (१/१/२०११ किंवा त्यानंतर), १२ वर्षांखालील (१/१/२०१३ किंवा त्यानंतर), १० वर्षांखालील (१/१/२०१५ किंवा त्यानंतर), ८ वर्षांखालील (१/१/२०१७ किंवा त्यानंतर) अशा विविध गटांसाठी होणार आहे. दि. 13 सप्टेंबर पर्यंत सहभाग नोंदवावा.
स्पर्धकांनी आधार कार्ड, स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक, टिफीन घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील (९४२११०४६५०), संदीप सारंग (९६७३१६५९६७), बाबूराव पाटील (९४२२७९०४९५), अनुष्का पाटील यांनी केले आहे.