+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule17 Jul 24 person by visibility 249 categoryसामाजिक
कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईखडी येथे भाविक भक्तांना सुगंधी दूध, खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

   सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी निमिताने कोल्हापूर ते प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ता. करवीर येथे पायी दिंडी निघत असते. या दिंडीमध्ये कोल्हापूर तसेच ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. या पायी दिंडीचे औचित्य साधून आज दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीने ५००० सुगंधी दूध पिशवी तसेच खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन मा.अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी याचा लाभ घेतला.

   या कार्यक्रमप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील, महिला नेतृत्व अधिकारी संपदा थोरात, संघाचे अधिकारी कर्मचारी व महिला स्वयंसेविका आदि उपस्थित होते.