+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule18 Jul 24 person by visibility 461 categoryसामाजिक
कोल्हापूर : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने साधलेल्या संपर्कानंतर माजी खासदार जलील उद्या १९ जुलैला कोल्हापूरात येणार नसल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यासह सामाजिक शांतता भंग होईल असं वर्तन करू नये. असे आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केले आहे. 

दि. 14 जुलै रोजी विशाळगड येथे घडलेल्या घटनेच्या पाश्र्वभुमीवर निषेध व्यक्त करणेसाठी AIMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दि.19 जुलै रोजी कोल्हापूर सह संपूर्ण राज्यात दुपारी 03.00 वा जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय तसेच तहसिल कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्रातील AIMIM चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले बाबतची माहिती वृत्त पत्राव्दारे व सोशल मिडीयाव्दारे कोल्हापूर पोलीस प्रशासनास प्राप्त झाली असून माजी खासदार इम्तियाज जलील हे दि. 19 जुलै रोजी कोल्हापूर जिल्हा दौ-यावर येणार आहेत. असे विविध माध्यमाव्दारे देखील माहिती प्राप्त झाली आहे.

वरील प्राप्त माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलीस प्रशासनाने दि. 17 जुलै रोजी माजी खासदार इम्तियाज जलील यांना फोनव्दारे संपर्क साधला असता त्यांनी कळवले की, दि.19 जुलै रोजी ते कोल्हापूर जिल्हा दौ-यावर येणार नाहीत.

कोल्हापूर जिल्हयातील विविध हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या दि. 19 जुलै रोजी कोल्हापूर जिल्हा दौ-याला तिव्र विरोध दर्शवून जर माजी खासदार इम्तियाज जलील हे कोल्हापूर जिल्हा दौ-यावर आलेवर कोल्हापूर बंद करणेत येईल असे जाहिर केले होते.

विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोल्हापूर जिल्हयातील सर्व नागरिकांनी कळविणेत येते की, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कळविले वरुन ते कोल्हापूर जिल्हा दौ-यावर येणार नाहीत. आपण सर्वांनी शांतता राखावी, सामाजिक सलोखा ठेवावा असे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येते की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सामाजिक शांतता भंग होईल अशा पध्दतीने स्टेटस लावू नये याबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आदेश काढले आहेत. या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे सायबर सेल व्दारे लक्ष ठेवणेत आले असून सोशल मिडीयाव्दारे जातीय तणाव निर्माण होणा- या पोस्ट प्रसारीत केलेस संबधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.