कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके
schedule21 May 25 person by visibility 312 categoryमहानगरपालिका

▪️आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज
कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून आज पावसाळ्यापूर्वी अग्निशमन विभागाकडुन अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर करण्यात आली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील अत्याधुनिक साधन सामुग्रीचे प्रात्यक्षिक प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांच्या समोर मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे यांनी दाखविले.
यावेळी प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी बोलताना मागील वर्षी योग्य नियोजन केल्यामुळे कोणतीही जिवीत व वित्तहानी झालेली नव्हती त्याच अनुषंगाने याही वर्षी महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थानाबाबत योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात यावी. पावसाळयापुर्वी शहरातील नाले सफाई, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक होर्डिंगवर, धोकादायक इमारतीवर कारवाई सुरु आहे. आपत्ती काळात महापालिकेच्या यंत्रणेसोबत बावडा रेस्क्यु फोर्सचे 50 स्वयंसेवक महापालिकेस आपत्ती काळात मदत करणार आहेत. शहरामध्ये कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली लाईल. सफाई कर्मचा-यांमार्फत 470 नाल्यांपैकी 90 टक्के नालेसफाईचे काम पुर्ण झाले आहे. जेसीबीद्वारे काढण्यात येणा-या नाल्यांपैकी 70 टक्के काम पुर्ण झाले असून पोकलँन्डद्वारे मुख्य नाल्याचे 60 टक्के काम पुर्ण झाले आहे. उर्वरीत कामे जलद गतीने होण्यासाठी जादा पोकलँन्ड मशिन लावून दहा ते बारा दिवसात हे काम पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आज अखेर शहरातून 17 हजार मेट्रीक टन गाळ नाल्यातून बाहेर काढण्यात आला असून अजूनही गाळ काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे शहरात कोणतीही आपत्ती आली तर त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
नदीमध्ये यावेळी प्रात्यक्षिक दरम्यान अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादा व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला पाण्यातुन लाईफ जॉकेट, फायबर इनर व दोरच्या सहाय्याने कसे वाचवले जाते याचेही लाईव्ह प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे अग्निशमन विभाग कडील कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी.ए.सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रालिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टींग बॅग, लाईफ लाईन लाँचर, व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा, क्विक रिस्पॉन्स व्हेईकल काही प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. यावेळी ऑल इंडिया इन्सीट्युट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट फायर कॉलेज विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाकडून आपत्ती कालीन कालवधीमध्ये बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी अति-आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त कपिल जगताप, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, ओंकार खेडकर, तांडेल किसन पवार, अभिजित सरनाईक, निवास जाधव, तानाजी वडर, विजय सुतार, प्रमोद मोरे, संग्राम मोरे, गिरीष गवळी, अभय कोळी, नितेश शिंगारे, सौरभ पाटील, रोहन लगडे, तसेच बावडा रेस्क्यु फोर्सचे स्वयंसेवक व अग्निशमन विभागाकडील जवान उपस्थित होते.