+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule21 Jul 24 person by visibility 522 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग विभागाच्या तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात निवड झाली आहे. 

महाविद्यालयाच्या कशिश ललवानी हीची विविध पाच विद्यापीठांमध्ये निवड झाली असून सोबत मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. कशिश हीची जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाचे "ग्लोबल लीडर्स अवॉर्ड" आणि १७,१०० डॉलर शिष्यवृत्ती, ⁠युनिव्हर्सिटी ऍट बफेलो ⁠स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे "मास्टर्स स्कॉलरशिप अवॉर्ड" आणि २५ हजार डॉलर्स शिष्यवृत्ती ,⁠युनिव्हर्सिटी ऍट अल्बानी येथे "डीन मेरिट अवॉर्ड" आणि प्रति सेमेस्टर २५०० डॉलर्स शिष्यवृत्ती, आणि स्टोनी ब्रूक आणि स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथे प्रवेश मिळाला आहे. महाविद्यालयाचा “सर्वोत्तम विद्यार्थिनी” पुरस्काराने सन्मानित कशिश हीने न्यूयॉर्क, यूएसए येथील “स्टोनी ब्रूक” विद्यापीठात डेटा सायन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम. एस.) करण्याचा निर्णय घेतला आहे. 

  स्मित नलावडे याची स्टीवन्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलोंजि हॉबोकेन न्यु जर्सी येथे निवड झाली आहे, त्याला १०हजार डॉलर्स शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर प्रसाद बापट याची निवड बुफ्फालो युनिव्हर्सिटी, न्युयार्क, यु.एस.ए.येथे झाली असून डेटा सायन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम. एस.) करणार आहेत. 

डी.वाय. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयतुन बी.टेक. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग विभागाच्या पाहिल्याचं २०२०-२४ बॅचच्या या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाले आहे. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ.सिद्धेश्वर पाटील आणि विभागातील शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले. 

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ.संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे यांनी अभिनंदन केले.