+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule26 Jul 24 person by visibility 305 categoryदेश
कोल्हापूर : बगॅस पासून साखर कारखान्यात तयार होणारी वीज ही ग्रीन एनर्जी आहे. त्यातून कमीत कमी प्रदूषण होते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने बगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना प्रतियुनिट प्रत्येकी एक रूपयांचे अनुदान दिले, तरी साखर कारखानदारीला मोठा फायदा होईल आणि ऊस उत्पादक शेतकर्‍याला दिलासा मिळेल. त्यामुळे बगॅसपासून वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने साखर कारखान्यांना सबसीडी द्यावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली. देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा खासदार महाडिक यांनी उपस्थित केला आहे.

 देशात प्रामुख्याने कोळशापासून वीज निर्मिती केली जाते. त्यातून प्रदूषण वाढते. पण देशातील अनेक साखर कारखाने बगॅसपासून वीज निर्मिती करतात. त्यातून शुध्द आणि हरित उर्जा निर्माण होते. बगॅसपासून वीज निर्मिती करताना, कमीत कमी कार्बन उत्सर्जन होते. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या साखर कारखान्यातून बगॅसपासून वीज निर्मिती होते. ती वीज शासन खरेदी करते. मात्र त्याचा दर अत्यंत कमी म्हणजे प्रतियुनिट केवळ ४ रूपये ६५ पैसे इतका असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. हा दर साखर कारखान्यांना परवडणारा नाही. एखाद्या साखर कारखान्याला बगॅसपासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प सुरू करण्यासाठी, किमान शंभर कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक करावी लागते. सध्या देशात ग्रीन एनर्जिला चालना देण्याचे सरकारचे धोरण आहे. अशावेळी बगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना पाठबळ देण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारने प्रतियुनिट एक रूपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केली.

 जगभरातून सध्या अनेक उद्योजक भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे देशात वीजेची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत साखर कारखान्यात तयार होणार्‍या बगॅसपासूनच्या वीज निर्मितीला चालना मिळाली, तर त्याचा फायदा सहकारी साखर कारखानदारीला आणि पर्यायाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे. साखर आणि इथेनॉलच्या माध्यमातून कारखाने उत्पन्न मिळवतात. पण आता राज्य आणि केंद्र सरकारने, बगॅसपासून वीज निर्मितीला प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका खासदार महाडिक यांनी मांडली.