+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustऐन दिवाळीच्या तोंडावर टिप्पर चालकांचा गेल्या महिन्यातील पगार न झाल्याने कर्मचारी हवालदील adjustविधानसभा निवडणूक 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दि.29 ऑक्टोबर रोजी एकूण 131 उमेदवारांनी 188 उमेदवारी अर्ज दाखल; शेवटच्या दिवसाखेर जिल्ह्यात 10 जागांसाठी 221 उमेदवारांनी एकुण 324 उमेदवारी अर्ज दाखल adjust कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार प्राथमिक व 2 लाख 51 हजार माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी पत्र लेखनातून केले पालकांना मतदानाचे आवाहन adjustशिवाजी विद्यापीठाचा भारतीय वायू दलासमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; अधिकारी, जवानांना उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळणार adjustकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृतीचे स्टिकर्स देऊन दीपावलीच्या शुभेच्छा adjustकोल्हापूर महानगरपालिका : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 7 व्यापाऱ्यांकडून 45 हजार रुपये दंड वसूल adjustकोल्हापुरात दिवाळी खरेदीसाठी रस्ते गर्दीने फुलले; खरेदीचा उत्साह शिगेला! adjustकळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदी निर्मित वस्तुंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उद्घाटन adjustकोल्हापूर जिल्ह्यात 12 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू adjustडीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘प्लॅस्टीक बॉटल व प्लॅस्टीकच्या चहाच्या कपापासून आकाशकंदील व इतर साहित्य’, नैसर्गिक स्त्रोताचा वापर करुन दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांचे अवाहन
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule29 Oct 24 person by visibility 356 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तावडे हॉटेल लाईन, शाहू टोल नाका, राजारामपुरी परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी करण्यात आली. यावेळी शाहू टोल नाका येथील विशाल ट्रेडर्स, जयवंत स्वीट्स, राजारामपूरी येथील शर्मा स्वीट्स, अय्यंगार बेकरी, पुरोहित बेकरी, जसवंत स्वीट्स व तावडे हॉटेल येथील श्याम सुखवानी शॉप अशा सात व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान प्लॅस्टीकचा साठा आढळून आला.

 त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने पाच व्यापा-यांना प्रत्येकी 5 हजार रुपये तर तावडे हॉटेल येथील श्याम सुखवानी शॉप व शाहू टोल नाका येथील जसवंत स्वीटस यांना प्रत्येकी रु 10000 असे एकूण 45 हजार रुपये दंड करुन तो वसूल करण्यात आला.

 ही कारवाई सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक भूमी कदम, सुशांत कावडे, मुनीर फरास, मनोज लोट व कर्मचारी यांनी केली.

तरी महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व नमूद आस्थापना व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.