कोल्हापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. व्यापारी वर्गाने दकानांवर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने शहर प्रकाशमय बनने आहे. शहरात रात्री उशिरापर्यंत नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.
कामगार वर्गाचे बोनस आणि पगारही झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसते. रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक्स बस्तु, लाईटच्या विविध प्रकारच्या माळा, विविध रंगाचे आकर्षक आकाशदिवे, रांगोळी, पणत्या, विविध प्रकारचे सेंट, सुगंधी अगरबत्या, सुगंधी तेल, उटणे, साबण तसेच दीपमाळांच्या खरेदीसाठी सर्वच दुकानांमध्ये गर्दी झाली आहे.
एकूणच दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर कोल्हापूर तेजोमय बनले आहे. त्यातच शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने शहरातील लहान मुलांची किल्ले बनविण्याची लगबग पहावयास मिळत आहे.
फराळाचे सर्व प्रकारचे पदार्थ विक्रीसाठी तयार होऊ लागले आहेत. बहुतांशी नागरिक फराळाचे सर्वच पदार्थ घरी करण्यापेक्षा तयार फराळ पसंत करतात, तसेच इयफ्रुटस यांनाही बाजारात मागणी असल्याने सर्वच दुकाने सजली आहेत. याबरोबरच घरी फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठीही वस्तुंच्या खरेदीला किराणा दुकानेही सजली असून या दुकानांमध्ये फार मोठी गर्दी झाली आहे. बाजारात दिवाळी खरेदीसाठी नागरिक बाहेर पडल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत गर्दी तर झालीच उलट व्यापार-उद्योग क्षेत्रात फार मोठी आर्थिक उलाढाल होत आहे,
दिवाळी सणामुळे घरात व घराबाहेरसंपूर्ण शहर विद्युत रोषणाईन उजळून निघ् लागले आहे. दिवाळी खरेदीसाठी अवध कोल्हापूर रस्त्यावर उत्तरले असून शहरात दिवसागणित गदींचा उच्यांक मोडला जात आहे. कोल्हापूरातील प्रमुख बाजारपेठामध्ये विशेषतः महाव्दाररोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, लक्ष्मीरोड, भाऊसिंगजीरोड, राजारामपुरी, शाहुपुरी, गांधीनगरसह उपनगरातील बाजारपेठामध्ये तोबा गर्दी पहावयास मिळते कपडे, इलेक्टॉनिक्स वस्तु तसेच सोन्या-चांदीचे दागिने यासह विविध वस्तूंच्या खरेदीचा उच्चांकही मोडला आहे. कापड दुकाने, रेडीमेड दुकाने, इलेक्ट्रॉनिक्सची टुकाने, सराफी टुकाने, फटाक्यांची दुकाने, गृहपयोगी वस्तु, बाहन व्यवसायातही तेजी निर्माण झाली आहे. साहजिकच दीपावली तेजोमय बनवण्यासाठी छोटे, मोठे व्यापारी, फेरीवाले आपल्या परीने प्रत्येक जण काम करत असून दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
* कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच बाजारपेठेतील वाढत्या गर्दीचा ताण शहरातील वाहतूक व्यवस्थेवर पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. प्रमुख रस्ते तसेच चौकाचौकात पोलीस यंत्रणा वाहतुकीचे नियंत्रण करीत आहे, तरीही वाहतूक नियोजन करताना वाहतूक शाखेची कसरत होत आहे यंत्रणेवर ताण पडत आहे.