कोल्हापूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर कोल्हापूर शहरामध्ये कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांचा गेल्या महिन्यातील पगार न झाल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. शहरातील कचरा उठाव हा ठेकेदारा मार्फत होत असला तरी कर्मचाऱ्यांच्या पगार होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेची असताना मात्र महानगरपालिका या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. याबाबत आम आदमी पार्टीच्या टिप्पर चालक संघटनेतर्फे महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे समजते मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावरती पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.
कोल्हापूर शहरातील कचरा उठाव हा ठेकेदारांमार्फत उठवला जातो या ठेकेदारा मार्फतच टिप्पर चालकांची भरती करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण 254 चालक आहेत. वेगवेगळ्या ठेकेदारांमार्फत यांचे पगार केले जातात मात्र प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला पगार व्हावा ही अपेक्षा आहे. पण प्रत्यक्षात सर्वसाधारण वीस तारखेला पगार होतात. मात्र गेल्या सप्टेंबर महिन्याचा पगार ऑक्टोबर संपत आला. तरी ही झाले नाहीत. यामुळे एन दिवाळीच्या तोंडावरती कर्मचाऱ्यांना पगार न झाल्यामुळे हवालदिल झाले आहेत.
आम आदमी पार्टी तर्फे टिप्पर चालक संघटनेच्या माध्यमातून चालकांना किमान वेतन मिळावा म्हणून आंदोलने करण्यात आले. त्यास आंदोलनातून मान्यता मिळाली. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार होत नाहीत यामुळे संबंधित ठेकेदार कंपन्याकडून सर्व अटी व नियमांचे पालन होत नाही नियमाचा भंग होत आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत आप तर्फे सातत्याने पत्रव्यवहार करून ही बाब निर्देशनास आणून दिली आहे मात्र यावर अजून ठोस कारवाई झालेली दिसत नाही. तसेच कर्मचाऱ्यांना किमान वेतन वेळेत मिळावे याबाबत आज बुथवारी आप संघटनेचे पदाधिकारी प्रशासक यांना भेटणार आहेत. यामुळे या बैठकीकडे टिप्पर चालकांचे लक्ष लागले आहे.